Krushna River Water : रामदऱ्यामध्ये जानेवारीत कृष्णा खोऱ्याचे पाणी ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Ranajgajit Singh Patil : मराठवाड्याच्या न्यायहक्काच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र.२ मधील पाचव्या टप्प्याचे काम अंतिम होत आले आहे.
Krishna River Water
Krishna River Wateragrowon
Published on
Updated on

Dharashiv News : धाराशिव : मराठवाड्याच्या न्यायहक्काच्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना क्र.२ मधील पाचव्या टप्प्याचे काम अंतिम होत आले आहे. या वर्षी झालेला अधिकचा पाऊस, भूसंपादन प्रक्रियेत जाणीवपूर्वक आणलेले अडथळे व वीज वाहक तारेच्या चोरीमुळे डिसेंबर अखेरीस अपेक्षित असलेली पंपगृहाची चाचणी आता जानेवारीत घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

त्यामुळे सिंदफळ तलावातील पाणी तुळजाभवानी देवीच्या चरणी रामदरा तलावात पुढील महिन्यात दाखल होणार असून, या कार्यक्रमासह अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या योजनेच्या पाहणी व आढावा बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली आहे, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.

Krishna River Water
Dharashiv News : धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची दादागिरी थांबवा ; आमदार कैलास घाडगे पाटील यांची विधानसभेत मागणी; क्षेत्र बळकावण्याच्या तक्रारी

जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाच्या प्रगतीचे तपशीलवार सादरीकरण करण्यात आले. उपसा सिंचन योजना क्र. २ बरोबरच एकूण प्रकल्प कार्यान्वित होण्यास नक्की किती कालावधी लागणार, नेमक्या कोणत्या अडचणी अजूनही आहेत आणि त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत सविस्तर चर्चा झाली.

कालमर्यादा निश्‍चित करून प्रत्येक शिल्लक काम पूर्ण करण्याबाबतचा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्ता देण्यात आला आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना क्रमांक २ चे काम सध्या मोठ्या वेगात सुरू आहे.

यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने तसेच भूसंपादन प्रक्रियेत जाणीवपूर्वक आणलेले अडथळे व वीज वाहक तारेची २ वेळा झालेली चोरी यामुळे यापूर्वी निर्धारित केल्यानुसार डिसेंबर अखेरीस चाचणी घेता आली नाही. या बाबींवर आता तोडगा काढण्यात आला असून, जानेवारीत टप्पा क्रमांक ५ ची चाचणी घेण्यात येणार आहे.

पाचव्या टप्प्याच्या चाचणीसह, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची पाहणी व आढावा बैठक घेण्यासाठी पाटील यांना वेळ देण्याची विनंती करण्यात आली आहे. कामांचा नियोजित आराखडा जाणून घेत स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विभागाच्या अधिकारी आणि कंत्राटदारांनी समन्वयाने नियोजनानुसार काम पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या आहेत. भूसंपादनाबाबत असलेल्या अडी-अडचणी प्राधान्याने दूर करण्याबाबत सोलापूर आणि पुणे जिल्हाधिकारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत आणि सर्व भूसंपादन प्रकरणे निकाली काढणेबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करून त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत.

या टप्प्यांचे काम पूर्ण

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा क्र. २ अंतर्गत एकूण ५ पंपगृह आहेत. यापैकी टप्पा क्र. २, ३ व ५ मधील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा क्र. १ व ४ मधील ही ७५ टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने टप्पा क्र. १ व ४ मधील कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबत संबंधित कंत्राटदारांना सूक्ष्म नियोजन करून त्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com