Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Intimation : पीक नुकसानीची माहिती ७२ तासांत विमा कंपनीस कळवा

Crop Insurance : शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीत परतीच्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. पिकांचे नुकसान झालेले असल्यास विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित विमा कंपनीस ७२ तासांमध्ये कळवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-२०२४ या हंगामाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी खरीप २०२४ मध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेतर्गत खरीपामध्ये जिल्ह्यातील ७ लाख ३३ हजार ३०३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस देणे गरजेचे आहे.

याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास विमा कंपनीचे तालुकास्तरावरील प्रतिनिधी, बँक व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी केले आहे.

...इथे करा तक्रार

नुकसानीबाबतची सूचना पीक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पीक विमा ॲप अथवा कृषी रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक १४४४७ या क्रमांकाचा वापर करावा. परंतु पीकविमा ॲप, कृषी रक्षक पोर्टल याद्वारे नुकसानीची सूचना देताना अडचण आल्यास शेतकऱ्यांनी थेट www.orientalinsurance.org.in या वेबसाइटवर जाऊन उजव्या बाजूला खाली ASKORIN या आयकॉनला क्लिक करावे व त्यामध्ये PMFBY Claims मध्ये जाऊन नुकसानीची सूचना नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT