Sangali News : सांगली ः परवाना मुदत संपलेल्या लाभधारकांनी, सहकारी संस्थांनी आपले पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने शुक्रवार (ता.३१) जानेवारी २०२५ अखेर आवश्यक कागदपत्रे सादर करून नूतनीकरण करून घ्यावेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव व जत तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सर्व लाभधारक / बागायतदार / सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या ज्या बागायतदारांचे, ग्राहकांचे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने मे २०२४ अखेर कार्यान्वित झालेले नाहीत, असे पाणी परवाने व विद्युत उपसा यंत्र परवाने शासनाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात येणार आहेत.
पाणी परवाने व विद्युत यंत्र परवाने नूतनीकरण न केल्यास परवाने आपणास आवश्यकता नाही असे समजून शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपोआप रद्द होतील,
सांगली पाटबंधारे विभागांतर्गत कृष्णा नदी, मध्यम प्रकल्प व लघू पाटबंधारे तलावांवर ३१ मे २०२२ यापूर्वी पाणी परवाना व विद्युत उपसा यंत्र परवाना मंजुरी घेणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगांव व जत तालुक्यातील, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सर्व लाभधारक / बागायतदार /
सहकारी पाणी पुरवठा संस्था यांनी नोंद घ्यावी.
ज्या सहकारी पाणी पुरवठा संस्था यांनी १ जुलै २०२३ ते ३० जून २०२९ या कालावधीचा पाणी परवाना पुनर्विलोकन करून क्षेत्र निश्चितीसह करारनामा करून घेतले नाहीत त्या सहकारी संस्थांनी त्वरित आपले संस्थेचे क्षेत्र निश्चित करून करारनामे करून घ्यावेत.
अन्यथा ज्या संस्थांनी १ जुलै २०२३ ते ३० जून २०२९ या कालावधीत ज्या लाभधारक सभासदांचे नमुना नंबर ७ चे अर्ज भरून दिले आहेत, त्या गट क्रमांकाचे क्षेत्र निश्चित केले जाईल व आपणास उर्वरित क्षेत्राची आवश्यकता नाही, असे समजून आपला उर्वरित क्षेत्राचा परवाना आपोआप रद्द होईल. याबाबत कोणाची काही हरकत असल्यास बुधवारपर्यंत (५ फेब्रुवारी) कार्यकारी अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग, सांगली यांच्या कार्यालयास लेखी निवेदन द्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.