Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Sales License : ‘खत विक्री परवाना नूतनीकरण करून घ्या’

खत विक्री झालेल्यांची नोंद पीओओश मशिनमध्ये न झाल्यास त्याचा स्टॉक ऑनलाइनला दिसतो त्यामुळे, खत पुरवठा करताना अडचणी येत आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : यंदा खरीप हंगामाचे (Kharif season) योग्य नियोजन केले आहे. मे महिन्यापूर्वी चांगल्या दर्जाचे भात बियाणे तसेच आवश्यक तेवढा खतपुरवठा (Fertilizer supply) केला जाणार आहे.

त्यामुळे विकास संस्थांनी खत विक्री परवाना नूतनीकरण करून घ्यावा. जेणेकरून सोसायट्यांना वेळेत खत पुरवठा करण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

विकास संस्था आणि खासगी उद्योजकांनी परवाने वेळेत नोंदणी करून घ्यावी. आपले सरकार केंद्रावर जाऊन याबाबत डीबीडी पोर्टलवर जाऊन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.

या हंगामात खत विक्री करताना ऑनलाईन स्टॉक पाहूनच खत पुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या धोरणानुसार खत पुरवठा केला जातो.

विकास संस्थांनी पॉज मशिन आणि लायसन अपडेट करून ठेवावे. खत विक्री झालेल्यांची नोंद पीओओश मशिनमध्ये न झाल्यास त्याचा स्टॉक ऑनलाइनला दिसतो त्यामुळे, खत पुरवठा करताना अडचणी येत आहेत.

कृषी उद्योग खतपुरवठा करण्यासाठी स्टॉक उपलब्ध आहे. आपल्याकडून मागणी आल्यानंतर तातडीने खतपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी खत विक्रेत्यांनी नोंदणी अपडेट करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: शेतकरी करणार हमीभाव आदेशाच्या प्रतींची होळी, संयुक्त किसान मोर्चाकडून २७ मे पासून देशव्यापी आंदोलन

Crop Insurance Compensation Delay: नांदेडला ५२ मंडलांतील शेतकरी विमा भरपाईपासून वंचित

Water Wastage: ऐन टंचाईत पाण्याची नासाडी

Electricity Supply Affects: जेऊर परिसरातील ऊस वाळतोय; शेतकरी संकटात

Fishing Ban: जूनआधीच होड्या किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT