Pink Bollworm  Agrowon
ॲग्रो विशेष

Pink Bollworm : कापूस उत्पादकांना दिलासा ; बोंडअळी नियंत्रणासाठी मिळणार अनुदान

Cotton Crop : कपाशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हरियाणा सरकारने अनुदान जाहीर केले आहे.

Swapnil Shinde

Pink Bollworm Pest Management : देशातील कापूस पिकाला यंदा कमी पाऊस आणि कीड-रोगांचा शेतकऱ्यांना फटका बसला. या संपूर्ण पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली. त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी हरियाणा सरकारने एकरी ४ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.

सध्या देशभरातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीतून जात आहेत. कारण गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले आहे. या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हरियाणा सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कापूस उत्पादन आणि किडीपासून संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी ४ हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देत आहे.

हरियाणा सरकारच्या कृषी विभागानुसार, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी कृषी निविष्ठांवर अनुदान म्हणून ५० टक्के किंवा रु. २,००० प्रति एकर, यापैकी जे कमी असेल (जास्तीत जास्त २ एकरपर्यंत) अनुदान दिले जाईल.

गुलाबी बोंडअळीच्या प्रतिबंधासाठी हरियाणा सरकारने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. यानुसार गुलाबी बोंडअळीपासून कपाशीचे पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाकडे सतत लक्ष दिले पाहिजे. शेतात कापूसाचे अवशेषांचा ढीग लावू नका. ते जाळून त्यांची विल्हेवाट लावण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT