Ground Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Ground Water Storage : रत्नागिरीत भूजल पातळीत वाढ झाल्याने दिलासा

Water Stock : राज्यात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीने यंदा दिलासा दिला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : राज्यात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या भूजल पातळीने यंदा दिलासा दिला आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्व्हेमध्ये पाच वर्षांच्या तुलनेत या वेळी जिल्ह्याची भूजल पातळी ०.०७ मीटर वाढली आहे.

जिल्ह्याचा हा सर्व्हे असला तरी ४ तालुक्यांमध्ये मात्र भूजलपातळी खालावलेली आहे. तसा अहवाल या विभागाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेला दिला आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दर तीन महिन्यांनी हा सर्व्हे होतो. त्यासाठी जिल्ह्यातील ६३ विहिरी निश्चित केल्या आहेत.

त्यांची पाणीपातळी मोजून त्यावर हा अंदाज बांधला जातो. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी वाढणार, अशी सर्वांची धारणा असते; परंतु अतिवृष्टीचा तसा भूजलपातळीवर थेट परिणाम होत नाही.

त्यासाठी रेनहार्वेस्टिंग किंवा पाणी अडवा-पाणी जिरवा हे अभियान राबवणे आवश्यक आहे. तरच भूजल पातळीत वाढ होते. पाच वर्षांतील सप्टेंबरमधील सरासरी पाणीपातळी ३.०१ मीटर होती. यामध्ये सर्वांत कमी मंडणगड तालुक्याची ०.९७ मीटर पाणीपातळी होती तर सर्वांत जास्त लांजा तालुक्याची ५.६२ मी. पाणीपातळी होती.

त्यानंतर उर्वरित तालुक्याची या दरम्यान पाणीपातळी होती; परंतु सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्व्हेमध्ये २.९४ मी. पाणीपातळी आहे. पाच वर्षांच्या तुलनेत ०.०७ मीटर एवढी भूजल पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील मंडणगड ०.०५ मी., दापोली ०.०७ मी., गुहागर ०.६७ मी., चिपळूण ०.१० मी. या चार तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटली आहे. उर्वरित खेड तालुक्यात ०.११ मी., संगमेश्वर ०.२७ मी., रत्नागिरी ०.४७ मी., लांजा ०.३९ मी., राजापूर ०.३३ मीटरने भूजलपातळी वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT