Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तने सोडा’

Rabi Season 2024 : सध्या जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू पेरणीसह ऊस लागवड सुरू आहे. जायकवाडी, निम्न दूधना, येलदरी-सिद्धेश्‍वर या धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा आहे.

Team Agrowon

Parbhani News : जायकवाडी, निम्न दूधना, येलदरी-सिद्धेश्‍वर या धरणाच्या कालव्याद्वारे रब्बी हंगामातील पेरणी तसेच पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने सोडण्यात यावीत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू पेरणीसह ऊस लागवड सुरू आहे. जायकवाडी, निम्न दूधना, येलदरी-सिद्धेश्‍वर या धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. परंतु पाटबंधारे विभागातर्फे पाणी पाळ्याचे नियोजन तसेच वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांचे नियोजन करता येत नाही. पाणी आर्वतनाचे वेळापत्रक जाहीर केल्यास शेतकऱ्यांना पीक नियोजन करता येईल. यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

पडलेल्या बाजारभावांमुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडदाचा उत्पादन खर्च निघणे कठिण झाले आहे. खरिपाची कसर रब्बी हंगामात भरुन काढण्यासाठी शेतकरी नियोजन करत आहेत.

त्यासाठी धरणाच्या कालव्याद्वारे तत्काळ पाणी सोडण्यात यावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करणार येईल, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यत्र किशोर ढगे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, माउली शिंदे, प्रसाद गरुड, पंडित भोसले आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

Early Banana Harvesting: आगाप कांदेबाग केळीची काढणी खानदेशात सुरू

Pandharpur ST Buses: आषाढी यात्रेसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसगाड्या

Coco Peat GST: बियाण्यांप्रमाणे कोकोपीटही जीएसटीमुक्त करण्यात यावे; राज्य भाजीपाला नर्सरी असोसिएशन

Collective Farming: कडूसच्या कृषी गटाकडून ‘सामूहिक शेती’

SCROLL FOR NEXT