Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : दुबार पिके घेण्यासाठी ‘भातसा’तून पाणी सोडा

Farmer Demand on Water : शहापूर तालुक्यातील भातशेती, भाजीपाल्यांच्या रब्बी व हंगामी लागवडीसाठी भातसा उजवा कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी डिसेंबर महिना सुरू होऊनही न सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : शहापूर तालुक्यातील भातशेती, भाजीपाल्यांच्या रब्बी व हंगामी लागवडीसाठी भातसा उजवा कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी डिसेंबर महिना सुरू होऊनही न सोडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कालव्यालगत शेती असलेले शेतकरी भातशेतीबरोबरच इतर भाजीपाला लागवड करून उत्पादन घेत असतात. त्यामुळे कालव्याचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

भातसा उजवा कालवा (तीर) हा ५४ किलोमीटर लांबीचा आहे. या कालव्याचा शहापूर, भिवंडी तालुक्यातील जवळपास ५० गावांना लाभ होत असून त्यामुळे जवळपास एक हजार ६१३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

भातसा कालव्यालगतच्या गाव-पाड्यातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटणार आहे. भातसा कालव्यालगत सरळाबे, खरिवली, आवरे-कांबारे, चेरपोली, शहापूर, सावरोली आसनगाव, वासिंद, दहागाव येथील रहिवाशांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

भातसा कालव्याच्या पाण्यावर अनेक ग्रामपंचायती अवलंबून आहेत. नागरिकांना पिण्यासाठी, दुबार शेती करण्यासाठी पाणी सोडण्यात यावे.
पांडुरंग बरोरा, माजी आमदार
भातसा कालव्यातून शेतीसाठी येत्या दोन-चार दिवसांत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरिकांना पाण्याची सोय होणार आहे.
रवींद्र पवार, उपअभियंता, भातसा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SBI Inflation Report : युद्ध आणि एल-निनोमुळे २०२६ मध्ये महागाई वाढेल; एसबीआयचा अहवाल

Global Transport System: हवाई, जल वाहतुकीची वैशिष्ट्ये

Farmer Training: कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांचे प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन

Farmer Crying Video Viral: शेतकरी बाजारात ढसाढसा रडला, 'व्हिडिओ व्हायरल'नंतर अधिकारी निलंबित

Chana Procurement: जालना जिल्ह्यात सहा केंद्रांवरून साडेसात हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT