Electricity Bill Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill : वीजबिलासाठी मोबाइलवर ४१ लाख नागरिकांची नोंदणी

Online Electricity Bill Registration : जानेवारीपासून मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केल्यानंतर ‘महावितरण’कडून संबंधित वीज ग्राहकांना तत्काळ दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : जानेवारीपासून मोबाइल क्रमांक व ई-मेलची नोंदणी केल्यानंतर ‘महावितरण’कडून संबंधित वीज ग्राहकांना तत्काळ दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे.

त्यासाठी जिल्ह्यात ४१ लाख ५ हजार १५० मोबाइल, तर दहा लाख ८५ हजार ६३० ई-मेलची नोंदणी नागरिकांनी केली आहे, अशी माहिती महावितरण विभागाच्या सूत्रांनी दिली.

‘महावितरण’ने बिलिंगची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. मोबाइल अॅपद्वारे प्रत्येक महिन्यांच्या एक ते २५ मधील एक निश्‍चित तारखेला लघुदाब वीज ग्राहकांकडील मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे.

त्यानंतर केवळ एक ते दोन दिवसांमध्ये वीजबिल तयार करण्यात येत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर ते मोबाइल किंवा ई-मेलद्वारे तत्काळ मिळविण्याची सोय ‘महावितरण’ने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी केवळ मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी करणे आवश्यक आहे.

‘ग्राहकांना संदेशाद्वारे माहिती’

‘‘मोबाइल क्रमांक नोंदणी केल्यास पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, खंडित वीजपुरवठ्याची माहिती रीडिंग घेतल्याची तारीख व वीज वापराच्या युनिटची संख्या, वीज बिलाची रक्कम, देय दिनांक वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस आदी माहिती ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे,’’ अशी माहिती ‘महावितरण’चे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT