Electricity Bills : वीजबिल रोखीने पाच हजार रुपयांपर्यंतच भरता येणार

Mahavitaran : वीजेचे बिल आता पाच हजार रुपयांपर्यंतच रोख स्वरूपात भरता येणार आहे. १ ऑगस्टपासून महावितरणने हा निर्णय घेतला आहे.
Electricity Rate Hike
Electricity Rate Hike Agrowon
Published on
Updated on

Nagar News : वीजेचे बिल आता पाच हजार रुपयांपर्यंतच रोख स्वरूपात भरता येणार आहे. १ ऑगस्टपासून महावितरणने हा निर्णय घेतला आहे. विद्युत नियामक आयोगाने वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा आणली आहे. त्यामुळे सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पद्धतीने प्राधान्य देत वीजदेयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्टपासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा राहणार आहे. महावतिरणचे सर्व ग्राहकांना (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबिल भरता येणार आहे. लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार ठेवली आहे.

Electricity Rate Hike
Electricity Bill : पासष्ट टक्के ग्राहकांकडून ऑनलाइन वीजबिल भरणा

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पद्धतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येऊ शकतो.

या प्रणालीची कार्यपद्धती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पद्धतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकिंग व यूपीआय आदी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. भारत बिल पेमेंट (बीबीपीएस) मार्फतदेखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो.

Electricity Rate Hike
Electricity Rate Maharashtra : महाराष्ट्रातील वीजदर इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक

या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजारांपेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस/एनइएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहकनिहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पद्धतीने वीजबिल भरणा निःशुल्क आहे. ऑनलाइन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त ५०० रुपये) इतकी सवलतदेखील देण्यात आली आहे.

ऑनलाइन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित आहे. या पद्धतीस रिझर्व बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. सद्यःस्थितीत महावितरणचे ११० लाख ग्राहक (६५ टक्के) ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत आहेत. यातून दरमहा महावितरणला साधारणत: २२५० कोटी महसुलाची वसुली होते.

...असे भरा वीजबिल

महावितरणकडून दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरित त्याच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे पोच मिळते. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते. ऑनलाइन वीज बिल भरणा पद्धत अत्यंत सुरक्षित आहे.

या संदर्भात काही तक्रार अथवा शंका असल्यास ग्राहक helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर महावितरणशी संपर्क साधू शकता. रांगेत वेळ वाया न घालवता महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या निःशुल्क ऑनलाइन भरणा सेवांचा वीज ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com