Electricity Bill : पासष्ट टक्के ग्राहकांकडून ऑनलाइन वीजबिल भरणा

Online Electricity Bill : पुणे परिमंडलातील स्थिती; ३५ टक्के ग्राहकांची भर
Electricity Bill
Electricity BillAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Electricity : पुणे : आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत एका क्लिकवर ग्राहकसेवा देणाऱ्या ‘महावितरण’च्या ऑनलाइन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. सद्यःस्थितीत दरमहा सरासरी १ कोटी १० लाख वीजग्राहक ५ हजार ७५० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा घरबसल्या व सुरक्षित भरणा करीत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्यात ३५ टक्के ग्राहकांची भर पडली आहे.

‘महावितरण’कडून बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन घरबसल्या वीजबिल भरण्याची सोय आहे. यासाठी सर्व ग्राहकांना ‘महावितरण’चे संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा आहे. याव्यतिरिक्त ५ हजारांपेक्षा जास्त वीजबिल असणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ‘महावितरण’ने आरटीजीएस, एनईएफटीद्वारे वीजबिल भरणा करण्यासाठीची देखील सुविधा पुरविली आहे.

Electricity Bill
Electricity Bill Waiver : तीस टक्के वीजबिल माफीसाठी १० दिवस शिल्लक

उच्चदाब व लघुदाबाच्या १ कोटी १० लाख ग्राहकांनी एकूण वसुलीच्या रकमेपैकी तब्बल ५ हजार ७५० कोटी रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला. यामध्ये पुणे परिमंडलातील २२ लाख ८३ हजार ग्राहकांनी सर्वाधिक १२०२ कोटी ७६ लाखांचा वीजबिलांचा भरणा केला आहे. त्यानंतर कल्याण परिमंडलातील १९ लाख ७ हजार ग्राहकांनी ७२५.७९ कोटी, तर भांडूप परिमंडलामध्ये १७ लाख ३१ हजार ग्राहकांनी २००५ कोटी ४१ लाखांच्या बिलांचा ऑनलाइन भरणा केला. बारामती परिमंडलातील १० लाख ६८ हजार ग्राहकांनी ५१९.३५ कोटी तर नाशिकमधील १० लाख ५३ हजार ग्राहकांनी ४६९.६४ कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com