Soybean, Moong, Urad Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरू

Soybean MSP : यावर्षीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमीदराने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे.

Team Agrowon

Buldana News : यावर्षीच्या हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमीदराने मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ‘नाफेड’च्या वतीने हमीदराने मूग ८ हजार ६८२ रुपये, उडीद ७ हजार ४०० रुपये आणि सोयाबीन ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केली जाईल.

मूग व उडीद नोंदणी व खरेदी सात जानेवारी २०२५ पर्यंत तर सोयाबीन नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून खरेदी १५ ऑक्टोबर पासून सुरू होईल. सोयाबीन १२ जानेवारी २०२५ पर्यंत खरेदी करण्यात येईल.

मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी ११ केंद्रांना मान्यता दिली आहे. या केंद्रांना नोंदणी व खरेदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.

बुलडाणा, मेहकर, शेगाव, लोणार, संग्रामपूर येथे तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती, साखरखेर्डा सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, चिखली येथे स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था, वरवट बकाल येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, माटरगाव येथे शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, किनगाव जट्टू येथे बिबी फार्मर प्रो. कंपनी, आणि मोताळा येथे संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्राला मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT