Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : ‘सीसीआय’कडून कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू

Cotton Procurement : खानदेशात कापूस खरेदीची तयारी कापूस महामंडळाने (सीसीआय) केली असून, त्यासंबंधी नोंदणी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस खरेदीची तयारी कापूस महामंडळाने (सीसीआय) केली असून, त्यासंबंधी नोंदणी सुरू झाली आहे. खानदेशात सुमारे ११ खरेदी केंद्र सीसीआय सुरू करणार आहे.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा, चाळीसगाव, जामनेर तालुक्यातील पहूर, शेंदूर्णी, जामनेर, भुसावळ, बोदवड, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार व शहादा येथे सीसीआय कापूस खरेदी करील.

खरेदीसंबंधी ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव दिला जाईल. खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना प्रथम खरेदी केंद्रात नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आधार कार्ड, कापूस पीकपेऱ्याची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्र आवश्यक असणार आहेत.

नोंदणी झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला कापूस विक्रीसाठी खरेदी केंद्रात मोबाइलद्वारे सूचना दिली जाईल. सीसीआयच्या खरेदी केंद्रात कापूस विक्रीसंबंधी शेतकऱ्यांना आधार, बँक खाते व मोबाइल लिंक करणे आवश्यक आहे. आधार व मोबाइल, बँक खाते लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस विक्रीनंतर फक्त तीन दिवसांत परतावा किंवा मोबदला पाठविला जाईल.

अधिकाऱ्यांची भेट व पाहणी

खरेदी केंद्र सुरू करण्याची पूर्ण तयारी सीसीआयने खानदेशात केली आहे. खरेदी केंद्रांत पर्यवेक्षक किंवा ग्रेडरची नियुक्ती झाली आहे. तसेच खरेदी केंद्रातील स्थिती, यंत्रणा याची पाहणी सीसीआयचे छत्रपती संभाजीनगर विभागातील व्यवस्थापक पी. अमरनाथ रेड्डी यांनी नुकतीच पाचोरा व इतर भागात केली.

खानदेशात कापूस खरेदीची सीसीआय लवकरच सुरू करणार आहे. त्यासाठी निश्‍चित खरेदी केंद्रांत शेतकऱ्यांना नोंदणी करून घ्यायची आहे. ही नोंदणी झाल्यानंतर संबंधितांना कापूस विक्रीसाठी केंद्रात बोलावले जाईल.
- पी. अमरनाथ रेड्डी, व्यवस्थापक, सीसीआय, छत्रपती संभाजीनगर विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT