Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : कोल्हापुरातील ऊस क्षेत्रात तीस हजार हेक्टरने घट शक्य

Sugarcane Production : यावर्षी आतापर्यंत केवळ ४८ टक्के उसाचे क्षेत्र नोंद झाले असून पाण्याअभावी उसाचे क्षेत्र तीस हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापुर जिल्ह्यात पावसाळ्यात फक्त ५७ टक्के पाऊस झाला. याचा परिणाम पेरणी हंगामावर झाला आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ ४८ टक्के उसाचे क्षेत्र नोंद झाले असून पाण्याअभावी उसाचे क्षेत्र तीस हजार हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. रब्बी हंगामातील ८३ टक्के पेरणी पूर्ण झाली असून उन्हाळी हंगामात पिकांना पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी जिल्ह्यात रब्बीच्या १०३ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यंदा पावसाळ्यात केवळ ५७ टक्के पाऊस पडला. यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामावर परिणाम जाणवत आहे. गतवर्षी उसाचे क्षेत्र १ लाख ८८ हजार हेक्टर होते. पाण्याअभावी उसाचे क्षेत्र कमी होण्यास सुरुवात झाली असून यंदाच्या हंगामात ३० हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

रब्बी हंगामाचे क्षेत्र सर्वसाधारण २१ हजार हेक्टर असते. या हंगामात पाण्याअभावी क्षेत्रात घट जाणवत आहे. ज्वारी पिकाची दहा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. परतीचा पाऊस न झाल्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीला ओलावा मिळाला नाही. यामुळे ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. यावर्षी गव्हाची १२०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सुमारे २५ टक्के पेरण्या कमी झाल्या आहेत.

यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चाराटंचाई सुरुवातीपासून जाणवली. यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. जिल्ह्यात १३३२ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी आतापर्यंत झाली आहे. तसेच तेरा हजार हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य पेरणी झाली आहे. हरभरा रब्बी हंगामाचे मुख्य पीक मानले जाते. परतीच्या पावसाच्या ओलाव्यावर हरभरा टोकण केला जातो.

मात्र परतीचा पाऊस झाला नाही आणि पाण्याची टंचाई असल्यामुळे सुरुवातीपासूनच हरभरा पिकाचे क्षेत्र कमी प्रमाणात लागण झाले. आतापर्यंत ३३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून ३० टक्के पेरण्या हरभऱ्याच्या ठप्प झाल्या आहेत. तर कडधान्य ८३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सूर्यफूल टोकणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. भुदरगड तालुक्यात ७० टक्के तर हातकणंगले तालुक्यात ७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT