Sugarcane Cultivation : राज्यातील ऊस लागवडी ठप्प

Sugarcane Farming : पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Sugarcane Seedling
Sugarcane Seedling Agrowon

Pune News : पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या चार लाख २८ हजार ३८ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. त्यातच उन्हाळ्यात उपलब्ध झालेला ऊस चाऱ्यासाठी जाणार असल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यातच ऑक्टोबर पडलेल्या कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडी कमी प्रमाणात झाल्या आहेत. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याची स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे.

Sugarcane Seedling
Sugarcane Cultivation : बेणे प्रक्रिया करूनच उसाची लागवड करावी

राज्यात सरासरीच्या दहा लाख ९५ हजार ७५ हेक्टरपैकी चार लाख २८ हजार ३८ हेक्टर म्हणजेच ३९ टक्के क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत. बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करतात. पूर्वहंगामी उसाच्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत करतात. सध्या सुरू उसाच्या लागवडी सुरू असून, पाण्याअभावी त्यासुद्धा खोळंबल्या आहेत.

गेल्या वर्षी याच काळात ६ लाख ४ हजार ३८५ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल एक लाख ७६ हजार ३४७ हेक्टरने घट झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावू लागल्याने ऊस लागवडी होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे ऊस लागवडीत फारशी वाढ होणार नसल्याचे चित्र आहे.

Sugarcane Seedling
Sugarcane Cultivation : नंदुरबारात ऊस लागवड स्थिर

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. आडसाली उसाच्या लागवडी केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस कारखान्याला तोडणीस देतात.

यंदा ऊस आगार असलेल्या पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांत ऊस लागवडी घटल्याचे चित्र आहे. मराठवाडा व विदर्भातही फारशा लागवडी झालेल्या नाहीत. त्यामुळे या भागात ऊस लागवडीची स्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे पुढील वर्षी साखर कारखान्यांसमोर उसाचा मोठा प्रश्‍न उपस्थित राहणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

विभागनिहाय उसाचे सरासरी क्षेत्र व ऊस लागवड (हेक्टरमध्ये)

विभाग --- सरासरी क्षेत्र -- यंदा झालेली लागवड -- टक्के

छत्रपती संभाजीनगर -- ९६,९१९ -- १५,३५४ --- १६

कोल्हापूर -- ४,२०,५८९ -- १,५०,३९५ --- ३६

नाशिक -- ४८,३९६ -- २८,९७० --- ६०

पुणे -- ३,४३,३९२ -- १,८०,४२४ --- ५३

लातूर -- १,६८,८९० -- ४३,३१४ --- २६

अमरावती -- ८,१७१ -- ७,९६१ --- ९७

नागपूर -- ७,२५८ --- १,३९४ --- १९

कोकण -- १६११ -- २२७ --- १४

माझ्याकडे एकूण ३० एकर शेती आहे. त्यापैकी दरवर्षी सुमारे १५ एकरांवर ऊस लागवड असते. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान कमी होते. त्यामुळे आठ ते नऊ एकरांवर लागवड केली आहे. सध्या पाणी बऱ्यापैकी आहे. मात्र उन्हाळ्यात पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ऊस शेतीला ठिंबक सिंचन केले आहे.
- रामचंद्र नागवडे, प्रगतिशील ऊस उत्पादक, बाभूळसर, ता. शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com