Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : देशाच्या ऊस गाळपात घट

Sugarcane Crushing : देशातील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. देशाचे ऊस गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी झाले आहे. यंदा ३१३७ लाख टन उसाचे गाळप झाले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशातील ऊस हंगामाची सांगता झाली आहे. देशाचे ऊस गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत १७९ लाख टनांनी कमी झाले आहे. यंदा ३१३७ लाख टन उसाचे गाळप झाले. यंदा विशेष करून उत्तर प्रदेशात गाळप घटले. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये १०९१ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा ९७७ लाख टन उसाचे गाळप झाले. कर्नाटकात ५८० लाख टनांचे गाळप झाले होते ते यंदा ५६५ लाख टनांवर आले.

गुजरात मध्ये ९५ लाख टन झाले होते ते यंदा ८९ लाख टनांवर आले आहे. आंध्र प्रदेशात दोन लाख टनांची घट आहे. महाराष्ट्र मात्र १६ लाख टनांनी ऊस गाळप वाढले आहे. उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत उसाच्या गाळपात घट झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या गाळपावर ही झाला आहे. अतिरिक्त ऊस असल्याने तमिळनाडूत तीन कारखाने अजूनही ऊस गाळप करत आहेत.

निव्वळ साखरेचे उत्पादन देखील गतवर्षीपेक्षा ९.६५ लाख टनाने कमी राहण्याचे अनुमान आहे. यंदाच्या वर्षी देशपातळीवरील १०.२० टक्के सरासरी साखर उतारा हा गेल्या वर्षीपेक्षा ०.२६ टक्क्याने जास्त आहे. ही या हंगामातील जमेची बाजू आहे. देशपातळीवर एकूण ३२१.२५ लाख टन इतके निव्वळ साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त २१ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीकडे होणे अपेक्षित आहे.

साखर उत्पादनाचे अंदाज वर्तविणे घाईचे

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी सांगितले, की यंदाच्या वर्षीचे पर्जन्यमान सर्वदूर आणि समाधानकारक राहण्याचे अपेक्षित आहे. त्याचा रानातील उभ्या उसाच्या वाढीसाठी तसेच आडसाली आणि पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी फायदा होणार आहे.

अर्थात, नवीन लागण होणाऱ्या उसाची उपलब्धता ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामासाठी होणार नसून, तो ऊस ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामामध्ये वापरला जाईल. ऊस हे दीर्घकालीन पीक असून, यंदाच्या अपेक्षित अनुकूल पर्जन्यमानाची मदत हंगाम २०२४-२५ साखर उत्पादन वाढीत परावर्तित होण्याची शक्यता नाही या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करून आतापासूनच चुकीचे साखर उत्पादनाचे अंदाज वर्तविणे घाईचे होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: राज्य सरकारचे अतिवृष्टीच्या मदतीचे दर अखेर जाहीर; शासन निर्णय जारी, काय आहेत मदतीचे दर?

Dragon Fruit Farming : ड्रॅगन फ्रूट, अॅव्होकॅडो, मसाला पिकांना ‘एकात्मिक फलोत्पादन’ मधून अनुदान

Jowar Cultivation : अतिवृष्टीमुळे ज्वारीच्या कोठारात हरभरा, करडई

Onion Market : निर्यात धोरणाचा, बाजार हस्तक्षेपाचा कांदा दरावर विपरीत परिणाम

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी तालुकास्तरावर करा

SCROLL FOR NEXT