Sugarcane Season : मराठवाड्यातील ५७ कारखान्यांच्या गाळप हंगाम पूर्ण

Sugarcane Crushing : मराठवाड्यात यंदा ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या ६१ कारखान्यांपैकी तब्बल ५७ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhakinagar News : मराठवाड्यात यंदा ऊस गाळपात सहभाग घेणाऱ्या ६१ कारखान्यांपैकी तब्बल ५७ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. या सर्व कारखान्यांनी ११ एप्रिलपर्यंत २ कोटी ५५ लाख ३२ हजार ९९३ टन उसाचे गाळप करत २ कोटी ४५ लाख १९ हजार २२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे साखर उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा सर्वांत जास्त, तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी सर्वांत कमी राहिला आहे.

यंदाच्या गाळप हंगामात सहभाग घेणाऱ्या ६१ कारखान्यांमध्ये धाराशिवमधील १४, छत्रपती संभाजीनगर व नांदेडमधील प्रत्येकी मधील ६ हिंगोली व जालन्यातील प्रत्येकी पाच बीड व परभणीतील प्रत्येकी सात, तर लातूरमधील ११ कारखान्यांचा समावेश होता.

Sugarcane Season
Sugarcane Season : उन्हाच्या झळा वाढल्याने साखर हंगाम कासावीस

साखर विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ५७ कारखान्यांनी त्यांचा ऊस गळा फायदा आटोपल्याची माहिती त्यांना कळविले आहे. त्यामध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे. तर जालन्यातील तीन व हिंगोलीतील एका कारखान्याचा ऊस गाळप हंगाम अद्याप सुरू असल्याचे साखर विभागाच्या माहितीवरून पुढे येते आहे.

तीन कारखाने राहणार सुरू

जालना जिल्ह्यातील घनसांगवी, अंबड तालुक्यात शिल्लक राहणारा ऊस लक्षात घेता तीन कारखाने सुरूच राहणार आहेत. ऊस संपेपर्यंत हे कारखाने सुरू राहणार असून, साधारणतः २० एप्रिलपर्यंत सर्व कारखान्यांचा ऊस गाळप झालेला असेल, असेही साखर विभागाच्या सूत्राने स्पष्ट केले.

जिल्हानिहाय ऊस गाळप व बंद कारखाने स्थिती

धाराशिव : जिल्ह्यातील सहा सहकारी व आठ खासगी मिळून १४ कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी ५१ लाख ३३ हजार ८४७ टन उसाच गाळप करत ४७ लाख १९ हजार ७४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.१९% इतका राहिला हे सर्व कारखाने बंद झाले आहेत.

Sugarcane Season
Sugarcane Season : ऊस गाळप हंगामाची सांगता

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तीन सहकारी व तीन खासगी मिळून ६ कारखान्यांनी ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या कारखान्यांनी १८ लाख ८३ हजार २७१ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.७४ टक्के साखर उताऱ्याने १८ लाख ३४ हजार ६३६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचे गाळप थांबले आहे.

जालना : जिल्ह्यातील ३ सहकारी व २ खासगी मिळून पाच कारखान्यांनी २७ लाख ८९ हजार १५९ टन उसाचे गाळप करत २६ लाख ५१ हजार ५६० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.५१ टक्के इतका राहिला.

बीड : जिल्ह्यातील ५ सहकारी व २ खासगी मिळून ७ कारखान्यांनी ३९ लाख ६१ हजार २७६ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.२२ टक्के साखर उताऱ्याने ३२ लाख ५५ हजार ३७९ क्विंटल साखर उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

परभणी : जिल्ह्यातील ७ खासगी कारखान्यांनी ३३ लाख ३५ हजार ५४५ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.९१ टक्के साखर उताऱ्याने ३३ लाख ६ हजार ८४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा गाळात हंगाम आटोपला आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच कारखान्यांनी १५ लाख ४१ हजार ९३८ टन उसाचे गाळप केले. या ऊस गाळपातून सरासरी ९.९६ टक्के साखर उताऱ्याने या कारखान्यांनी १५ लाख ३६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांपैकी चार कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.

नांदेड : जिल्ह्यातील १ सहकारी व ५ खासगी मिळून सहा कारखान्यांनी १९ लाख ४७ हजार २३६ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.९७ टक्के साखर उताऱ्याने १९ लाख ४० हजार ५३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे

लातूर ः जिल्ह्यातील सहा सहकारी व पाच खासगी मिळून ११ कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदवायला. या कारखान्यांनी ४९ लाख ४० हजार ७२१ टन उसाचे गळे केले हे गाळप करत असताना सर्व कारखान्यांनी सरासरी १०.६८ टक्के साखर उतारा राखत ५२ लाख ७४ हजार ३३२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com