Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीत घट

Summer Soybean Update : यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई भासणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असे असले तरी यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा घटला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : गेल्या वर्षी पावसात भिजलेल्याने सोयाबीन बियाण्याच्या उगवणशक्तीवर परिणाम झालेला होता. त्यामुळेच गेल्या वर्षी बियाण्यांसाठी उन्हाळी सोयाबीनचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. यंदा बियाणे उपलब्ध असल्याने उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीत घट झालेली आहे.

दर वर्षीची बियाणेटंचाई, चढ्याभावाने विक्री, निकृष्ट बियाण्यांमुळे उगवणशक्तीवर परिणाम, घटती उत्पादकता यावर स्वत:च उत्तर शोधत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बियाणेनिर्मितीवर भर दिला. खरिपात ३५ टक्के बियाणे बदल या तत्त्वानुसार जिल्ह्यात बियाणे लागणार आहे. शेतकरी सोयाबीन बियाणे निर्मितीत आत्मनिर्भर बनले आहेत.

यंदा सोयाबीन बियाण्याची टंचाई भासणार नसल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. असे असले तरी यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा घटला आहे. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. बियाण्यांची टंचाई जाणवू नये, यासाठी उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रकल्प जिल्ह्यात राबविण्यात आला.

जिल्ह्यात पहिल्यांदा साडेपाच हजार एकरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. यंदा सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले आहे. दर्जाही चांगला आहे. त्यामुळे यंदा उन्हाळी सोयाबीन पेरणीकडे शेतकऱ्याने दुर्लक्ष केले आहे. सोयाबीनला नसलेला भाव पाहता शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी हरभरा, गव्हाला पसंती दिली आहे.

महाबीजकडून तयारीला सुरवात

यंदा सोयाबीन बियाणे मुबलक व चांगल्या दर्जाचे उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी खरीप हंगामात बियाणे टंचाईची शक्यता कमी आहे. महाबीजने खरिपाच्या तयारीला सुरुवात केली आहे. चांगल्या दर्जाचे सोयाबीनची पॅकिंग सुरू केली आहे. अद्याप बियाण्याचे उद्दिष्ट महाबीजला आलेले नसले तरी महाबीजकडून नियोजन केले जात आहे.

भावात घसरणीचा परिणाम

गेल्या वर्षी सोयाबीनला बाजारात चांगला दर होता. परिणामी, शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला. यंदा सुरुवातीपासून सोयाबीनचे दर खाली आहेत. त्यात वाढ झालेली नाही. बाजारातील भावाचा आलेख पाहता शेतकऱ्यांनीही सोयाबीनऐवजी इतर पिकांना पसंती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Scam: विनापरवाना बेकायदेशीर खतनिर्मिती करून विक्री

Kurundkar Banana Chips: कुरुंदकर कंपनीची केळी चिप्स निर्मिती  

Organic Turmeric Farming: सेंद्रिय हळदीची शेती, पावडरीतून मूल्यवर्धन  

Radhakrishna Vikhe Patil: शेतकऱ्यांनी कर्ज काढायच, कर्जबाजारी व्हायच आणि त्यानंतर कर्जमाफी मागायची; राधाकृष्ण विखे पाटलांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान

Farmer Loan Waiver : शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी; विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून निषेध

SCROLL FOR NEXT