Dairy Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price Crisis: गाईच्या दूधदरात कपात

Dairy Farmer Issue: मागील काही महिन्यांपासून गाईच्या दुधाला ३३ ते ३४ रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळत होता. मात्र दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाच्या दरात बहुतांश खासगी दूध संघांनी कपात केली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: मागील काही महिन्यांपासून गाईच्या दुधाला ३३ ते ३४ रुपये प्रति लिटरपर्यंत दर मिळत होता. मात्र दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्याचे सांगत दुधाच्या दरात बहुतांश खासगी दूध संघांनी कपात केली आहे. ६ जूनपर्यंत जवळपास प्रति लिटर दोन ते तीन रुपये दर कमी केला आहे. दुधाचे दर कमी झालेले असले, तरी पशुखाद्याचे दर मात्र वरचेवर वाढत असल्याने उत्पादक चिंतेत आहेत.

राज्यात दर दिवसाला दोन ते अडीच कोटी लिटर गाईच्या दुधाचे संकलन होते. अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली भागांत दूध व्यवसाय करणारे शेतकरी अधिक आहेत. दूधदराचा प्रश्‍न मात्र कायम आहे. यंदा उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थाला लग्नसराई व अन्य कार्यक्रमांमुळे मागणी होती. गाईच्या दुधाला प्रति लिटर ३४ रुपयांपर्यंत दर गेला होता. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाला २१ मे पर्यंत ३४ रुपये दर मिळत होता.

दूध खरेदीदार संघांनी १ जूनपर्यंत टप्प्या टप्प्याने दर कमी करत तो ३२ रुपये व ६ जूनपासून ३१ रुपये लिटर दर केला आहे. अजूनही १ ते दोन रुपयांनी कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारात पावडर व बटरचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

वर्षभरापूर्वी दुधाला दर मिळत नसल्याबाबत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांनी मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार गेल्यावर्षी जानेवारी व फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत अनुदान दिले. सहा महिन्यांपासून हे अनुदानही बंद आहे. आता अनुदान बंद असताना दुधाचे दरही कमी केले जात आहेत. दर कमी केले जात असल्याने उत्पादन खर्च मात्र वाढता असल्याने दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.

यंदा उन्हाळ्यात कांदा लागवड अधिक होती. त्यामुळे चाऱ्यांची लागवड कमी झाल्याचे सध्या चाऱ्याचे दरही गतवर्षीपेक्षा वाढलेले आहेत. चारा, पशुखाद्य आणि औषधोपचाराचा खर्च पंचवीस टक्के वाढल्याने आणि त्यात दुधाचे दर कमी केले जात असल्याने दूध उत्पादकांची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.

चारा, पशुखाद्याचे दर (रुपयांत)

- सरकी पेंडी ७० किलोचे पोते - २७०० ते २८००

गोळी पेंडीचे ५० किलोचे पोते - १७०० ते १७५०

- वालीसचे ४९ किलोचे पोते - १३०० ते १३५०

भेसळीकडे दुर्लक्ष कायम

राज्यात दुधाच्या पडत्या दरासोबत दुधात होणारी भेसळही सतत चर्चेत असते. दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागतील, असे सातत्याने सांगत आहेत. मराठवाडा, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात दुधभेसळ उघड झाली होती. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन घटलेले असतानाही दूध संकलन कमी होत असल्याने भेसळीमुळे हे दूध वाढत असल्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा आरोप आहे. दूध भेसळ सर्वश्रुत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अडचणींवर मात करून दूध व्यवसाय करतो. मात्र दुधाचे दर कमी केले जात आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने दूध दराला आधार देणे गरजेचे आहे. अन्यथा, शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय मोडून जाईल.
देविदास भसे, दूध उत्पादक, मोहोज, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT