Amul Milk Export: ‘अमूल’चे दूध आता स्पेनमध्येही मिळणार

Dairy Cooperative Partnership: गुजरातची ‘अमूल’ कंपनी स्पेनच्या सहकारी कंपनी सीओव्हीएपीसोबत भागीदारी करून युरोपात आपले दूध व उत्पादनं विक्रीस आणणार आहे. माद्रिद, बार्सिलोना, पोर्तुगालसह इतर युरोपियन शहरांमध्ये अमूलची उत्पादने लवकरच उपलब्ध होतील.
Amul Dairy Success
Amul Dairy SuccessAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्थात ‘अमूल’ने बुधवारी (ता. ४) स्पेनच्या कोऑपरेटिव्हा गणदेरा डेल व्हॅले डे लॉस पेड्रोचेस (सीओव्हीएपी) या सहकारी कंपनीशी भागीदारी घोषित केली. स्पेन आणि युरोपीय महासंघातही अमूलचे दूध उपलब्ध करण्यात येणार आहे.

Amul Dairy Success
Amul Dairy Industry: ‘अमूल’चा आदर्श

या भागीदारीद्वारे, सुरुवातीला माद्रिद, बार्सिलोना आणि त्यानंतर पोर्तुगालमधील मालागा, व्हॅलेन्सिया, एलिकॅन्टे, सेव्हिल, कॉर्डोबा आणि लिस्बन येथे अमूलची उत्पादने उपलब्ध होतील. भविष्यात, जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडसह इतर युरोपीय देशांमध्ये उत्पादनांच्या विक्रीची योजना अमूलकडून आखली जात आहे.

Amul Dairy Success
Amul Milk Rate : अमूलच्या दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ; उत्पादन खर्च वाढल्याने केली दरात वाढ

युरोपमध्ये ‘अमूल’चे ताजे दूध मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमूलवरील वाढता विश्वास आणि संयुक्त राष्ट्रांने घोषित केलेल्या २०२५ च्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात, अमूल युरोपात उत्पादने उपलब्ध करणार आहे. स्पॅनिश कंपनी सीओव्हीएपीसोबत सहयोग करताना खूप सन्मान आणि आनंद होत आहे, असे अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले.

‘सीओव्हीएपी’चे अध्यक्ष रिकार्डो डेलगाडो विझकाइनो म्हणाले, की ‘अमूल’सोबतची ही भागीदारी आम्हाला स्पेनमध्ये आमचा ब्रँड वाढवण्यासाठी आणखी एका सहकारी संस्थेसोबत काम करण्याची संधी देत. ज्यामुळे केवळ आमच्याच डेअरी शेतकरी सदस्यांनाच नव्हे, तर भारतातील डेअरी शेतकरी सदस्यांनाही फायदा होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com