Parbhani Cotton News : परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत बाजार समित्यांतील कापसाच्या दरात घट सुरू आहे. किमान दर ६ हजारांच्या तर कमाल दर ८ हजारांच्या खाली गेले आहेत. बुधवारी (ता. १७) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ५९०० ते कमाल ७६७५ रुपये तर सरासरी ७६५० रुपये दर मिळाले.
परभणी जिल्ह्यातील कापूस खरेदी हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये १५ ते २५ टक्के फरदड कापसाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे किमान व कमाल दरात परत घसरण झाली आहे.
कापसाच्या बाजारात तेजी येऊन दर सुधारतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी पहिल्या वेचणीचा दर्जेदार कापूस (Cotton) अद्याप विक्री केलेला नाही. परंतु मागील महिन्यात दर साडे आठ हजारांवर गेले परंतु साडे आठ हजार रुपायांच्या आतच राहिले. जेमतेम आठवडाभर आठ हजारांवर दर मिळाले. परंतु त्यानंतर दरात घट सुरू झाली. सेलू बाजार समितीत प्रतिदिन १५०० ते २००० क्विंटल कापसाची आवक होत आहे.
मंगळवारी (ता. १६) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७६५५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १५) प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७७८० रुपये तर सरासरी ७७२० रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीत सोमवारी (ता. १५) कापसाची २९०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७८८५ रुपये तर सरासरी ७७५० रुपये दर मिळाले.
शुक्रवारी (ता. १२) ३४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७७५० रुपये तर सरासरी ७६७५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. १०) २४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७९०० रुपये तर सरासरी ७८५० रुपये दर मिळाले.
सध्या आवक होत असलेल्या कापसात १५ ते २० टक्के फरदड आहे. दरातील तेजीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कापूस साठवून ठेवलेला आहे. रुईच्या गाठींना मागणी कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून दर कमी झाले आहेत. मे अखेरपर्यंत कापूस खरेदी सुरू राहील.
- राजीव वाघ, सचिव, बाजार समिती, सेलू, जि. परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.