Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अमरावतीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतनिधीत कपात

Farmer Relief : या वर्षी नैसर्गिक आपत्तिग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार देण्यात येणाऱ्या मदतीची क्षेत्रमर्यादा वाढविण्यात आली असली तरी मदतनिधीत मात्र कपात करण्यात आली आहे.

Team Agrowon

Amaravati News : या वर्षी नैसर्गिक आपत्तिग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार देण्यात येणाऱ्या मदतीची क्षेत्रमर्यादा वाढविण्यात आली असली तरी मदतनिधीत मात्र कपात करण्यात आली आहे.

पाच ते तेरा हजार रुपयांची कपात राज्य सरकारने केली असून, मदतीची घोषणा करताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणारे म्हणून या नुकसानीपोटी राज्य सरकारने मदतीचा हात समोर करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, या नुकसानीचे पंचनामे करण्यात यंत्रणांनी विलंब केला. त्यानंतर सरकारने मदतीची घोषणा केली असली, तरी ती दिवाळीपूर्वी मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

३१ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयात नैसर्गिक आपत्तिग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार देण्यात येणाऱ्या मदतीची क्षेत्रमर्यादा वाढविण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. मदतीचे क्षेत्र दोन हेक्टरहून वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आले. त्याच वेळी मदतीचे निकष मात्र बदलविले. गतवर्षीच्या निकषात बदल करताना मदतनिधीत प्रति हेक्टर मोठी कपात करण्यात आली.

कोरडवाहू, बहुवार्षिक व बागायती पिकांचा निधी कपात करण्यात आला. गतवर्षी बागायती पिकांसाठी हेक्टरी २७ हजार ५०० रुपये निधी देण्यात आला. त्यामध्ये १० हजार ५०० रुपये कपात करून ती १७ हजार रुपयांवर आणली आहे.

तर बहुवार्षिक पिकांसाठी ३६ हजार रुपयांहून २२ हजार ५०० रुपये व कोरडवाहूसाठी १३ हजारांवरून ८ हजार ५०० रुपयांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. गतवर्षीच्या तुलनेत नुकसानभरपाईच्या मदतनिधीत कपात करण्यात आल्याने शेतकरी नाराज झाले आहेत.

जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित शेतकरी व क्षेत्र

क्षेत्र बाधित शेतकरी बाधित क्षेत्र अपेक्षित निधी (कोटी)

जिरायती ८५,८३१ ६२,५३९ ५३.१५

बागायत ५१० ३६६ ६.२२

फळपीक ९३३० ९१६४ २०.६१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT