Agriculture Inputs Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Inputs : बाजारातील कृषी निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करा

Latest Agriculture News : डॉ. गडाख म्हणाले, ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्याची आता गरज आहे. हा समतोल न राखण्याचे दुष्परिणाम आपण सर्वच भोगत आहोत.

Team Agrowon

Agriculture News : हंगामात शेतीकामी लागणाऱ्या निविष्ठांबाबत बाजारावरील अवलंबिता वाढली आहे. त्याच्याच परिणामी उत्पादकता खर्चही वाढल्याने शेतीचे अर्थकारणच बिघडले. बाजारावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी निदान घरचे बियाणे तरी वापरले पाहिजे, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिला.

सेवा समिती आनंदवनद्वारा संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय व आनंदन कृषी तंत्र विद्यालय यांच्यातर्फे बीजोत्सव-२०२३ च्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. विकास आमटे होते. पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, सुधाकर कडू, डॉ. दिलीप पेशवे, हर्षदा पोतदार, वसंत फुटाणे, प्राची माहूरकर उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘पर्यावरणाचा समतोल राखण्याची आता गरज आहे. हा समतोल न राखण्याचे दुष्परिणाम आपण सर्वच भोगत आहोत. पर्यावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे. भविष्यात हे आव्हान गडद होईल. त्यापूर्वीच उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढवित जमीन आरोग्य जपून उत्पादकता वाढीचा उद्देश साधावा.  

यामध्ये सुभाष शर्मा, संजय पाटील, सुरेश गरमाडे, विद्या रुद्राक्ष, शिवदास कोरे, प्रताप मारोडे, डॉ. श्‍यामकुवर, सुभद्राताई, आसावरी पोशेट्टीवार, निर्मला काठोके, पद्यताई गुरनुले, गीताताई, श्‍वेता भट्टड, शंकर घाटावार, सावित्री अनंत, आराधना ताठे, ईश्‍वर माकोडे, अनंत भोयर होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT