Organic Input
Organic InputAgrowon

Organic Agriculture Inputs : नांदेड जिल्ह्यात जैविक कृषी निविष्ठा उपलब्ध

Agriculture Inputs : कृषी विभागामार्फत प्रचार, प्रसार व निविष्ठा केंद्रामार्फत जैविक कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होईल.
Published on

Nanded : शेतकरी पिकांच्या वाढीच्या सुरुवातीला महागडी, अधिक तीव्रतेच्या कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ होऊन मित्र किडींची संख्या घटत जाते.

यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्यात उपलब्ध करुन दिलेल्या जैविक कृषी निविष्ठांचा वापर करुन शास्त्रीय पद्धतीने किडी व रोगांचे नियंत्रण करावे व पीक उत्पादन खर्चामध्ये बचत करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

Organic Input
Organic Inputs : जैविक निविष्ठांचा वापर कसा करावा?

जिल्ह्यात चला जाऊ गावाकडे - समृद्ध ग्राम निर्मिती अभियान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या अभियान दरम्यान शेतकऱ्यांना भेटी देण्यात आल्या व चर्चा करण्यात आली. यात शेतकऱ्‍यांना अजूनही मित्रकिडी, शत्रू किडींचे जीवनक्रम, कमी खर्चात किडीचे नियंत्रण जसे जैविक, भौतिक पीक पद्धती इ.ची माहिती पुरेशा प्रमाणात नसल्याचे आढळून आले.

Organic Input
Organic Inputs Price Chart : जैविक निविष्ठा पुरवठ्याचे दरपत्रक ‘कृषिउद्योग’कडून जाहीर

कोणत्याही पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत किमान २ ते ३ फवारणी ५ टक्के लिंबोली अर्क करणे, चवळी, झेंडू, आंबाडी, एरंडी यांसारखी सापळा पिकांची लागवड करणे, पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर करून सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅकसारख्या रोगाचे यशस्वीरीत्या नियंत्रण करणे शक्य आहे.

कृषी विभागामार्फत समन्वय करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, मित्र किडीचे संगोपन करणे, विशेषत: वेगवेगळ्या भाजीपाल्यामध्ये याचा अधिक वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

१० टक्के उलाढाल जैविक कृषी निविष्ठांद्वारे करा


कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर मिळणाऱ्या वेगवेगळ्या जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके, जैविक खतांचा वापर करून पिकांच्या उत्पादन खर्चात बचत करता येते हे सिद्ध झाले आहे.

मात्र याची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी प्रत्येक तालुक्यात किमान ३ ते ४ निविष्ठा विक्रेत्यांना त्यांच्या उलाढालीच्या किमान १० टक्के उलाढाल जैविक कृषी निविष्ठांद्वारे करण्यासाठी आदेशित केले आहे. जेणेकरून कृषी विभागामार्फत प्रचार, प्रसार व निविष्ठा केंद्रामार्फत जैविक कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com