Longest Hapus Leaf Agrowon
ॲग्रो विशेष

Longest Hapus Leaf : हापूसच्या सर्वाधिक लांबीच्या पानाची गिनेस बुकमध्ये नोंद

Hapus Mango : हापूसचे जगातील सर्वाधिक मोठे पान म्हणून जिल्ह्यातील कुडाळ येथील चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेतील पानाची नोंद गिनेस वर्ल्ड आणि वर्ल्ड वाइल्ड बुकमध्ये नोंद झाली आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : हापूसचे जगातील सर्वाधिक मोठे पान म्हणून जिल्ह्यातील कुडाळ येथील चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेतील पानाची नोंद गिनेस वर्ल्ड आणि वर्ल्ड वाइल्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. या पानाची लांबी ५५.६ सेंटिमीटर, तर रुंदी १५.६ सेंटिमीटर आहे. दोन जागतिक विक्रमांचा मान या पानाला मिळाला आहे.

कुडाळ येथील श्री. काजरेकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी शेती बागायतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. त्यांची हापूस आंबा, काजू लागवड देखील आहे. श्री. काजरेकर यांना आपल्या बागेतील एका झाडावर आलेले पान हे इतर पानांच्या तुलनेत आकाराने खुपच मोठे असल्याचे दिसून आले.

कुतूहल निर्माण झाल्याने त्यांनी त्या पानाची लांबी व रुंदी मोजली. त्या पानांची लांबी ५५.७ सेंटिमीटर, तर रुंदी १५.६ सेंटिमीटर मिळून आली. त्यामुळे श्री. काजरेकर यांनी गूगलच्या साह्याने जगातील हापूसच्या पानांचे जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. यामध्ये त्यांना आपल्याकडील पानाचा आकार तुलनेने अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी या पानांची जागतिक पातळीवर नोंद व्हावी याकरिता प्रयत्न सुरू केले.

श्री. काजरेकर कुटुंबीयांच्या मदतीने गिनेस वर्ल्ड रेकॉर्डस, वर्ल्ड वाइल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी फेब्रुवारी २०२३ ते एप्रिल २०२३ पर्यंत ही प्रकिया सुरू होती. त्यानंतर हा दोनही संस्थांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर पुनर्तपासणीचे रेकॉर्ड तयार करण्यात आले.

डॉ. विलास झोडगे आणि संत राऊळ महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे वनस्पतिशास्त्र प्रमुख प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, प्रा. उमेश कामत व प्रा. दयानंद ठाकूर यांनी गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या.

जूनमध्ये या दोनही संस्थांनी जूनपर्यंत नोंद स्वीकारली. त्यानंतर या दोनही संस्थांनी जगातील सर्वांत मोठे हापूसचे पान म्हणून नोंद केली आहे. यापूर्वी नोंद असलेल्या पान ४२ सेमी लांबीचे असून ते केरळमधील असल्याचे बागायतदार श्री. काजरेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Crops: डाळिंबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव; केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून गंभीर दखल, तज्ज्ञांचे पथक शेतकऱ्यांच्या मदतीला

Automated Weather Station : हवामान केंद्रे ९९६ ग्रामपंचायतींत उभारणार

Banana Plantation : खानदेशात केळी लागवडीस गती

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना एफआरपीबाबत अपेक्षा

Rabi Season Aid: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजारांची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT