Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Variety : ‘रत्नागिरी-८’ वाणाची विक्रमी ८० टन विक्री

Ratnagiri-8 Variety of Paddy : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या (BSKKV) शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने (Paddy Research Center) संशोधित केलेली ‘रत्नागिरी-८’ या जातीच्या लागवडीकडे कल वाढला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : चवीला उत्तम, मध्यम बारीक दाणा, १३५ दिवसांत तयार होणाऱ्या ‘रत्नागिरी-८’ (सुवर्णा-मसुरा) या भाताची गोडी महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचली आहे. राष्ट्रीय पातळीवर शिफारस केलेली ही जात असल्यामुळे देशातील काही खासगी कंपन्या, विद्यापीठाच्या मान्यतेने ‘रत्नागिरी-८’ बियाणे तयार करण्यात आले आहे. यावर्षी वाणाची ८० टन एवढी विक्रमी विक्री झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव भात संशोधन केंद्रातर्फे २०१९ मध्ये ‘रत्नागिरी-८’ हे वाण विकसित केले. कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या पाच जिल्ह्यांमध्ये या वाणाने लोकप्रियता मिळवली असून, कोकणासह विदर्भातही मागणी आहे. या वाणाला उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतूनही पसंती मिळाली आहे. बदलत्या हवामानात टिकणारी ही योग्य जात असून, उशिराने पडणाऱ्या पावसाचा फटका याला बसत नाही.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत या बियाण्याची लागवड केली जाते. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी रत्नागिरी व फोंडा (सिंधुदुर्ग) केंद्रावर मिळून ८० टन बियण्यांची विक्री झाली. गतवर्षी ५० टन विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मागणी वाढली आहे. अजून मागणी होती. मात्र, बियाण्याची कमतरता भासली. ‘सुवर्णा’ या जातीला पर्याय म्हणून ‘रत्नागिरी-८’ ही जात विकसित केली. १३५ ते १४० दिवसांत हे भातपीक तयार होते.

कोकण कृषी विद्यापिठाअंतर्गत शिरगाव भात संशोधन केंद्राने आतापर्यंत भाताच्या अकरा जाती व एक संकरित जात विकसित केली आहे. ‘रत्नागिरी-१’ हे वाण जुने असून, देशाबरोबरच अमेरिका व दक्षिण आफ्रिकेत या वाणाने लोकप्रियता मिळविली असताना आता ‘रत्नागिरी-८’ या वाणाला परराज्यातही पसंती मिळाली आहे. वाढत्या मागणीमुळेच विक्रमी विक्री होऊ शकली आहे.
डॉ. विजय दळवी, प्रभारी अधिकारी, भात संशोधन केंद्र शिरगाव (रत्नागिरी)

कापणी वेळेवर केल्यास तांदळाचा तुकडा होण्याचे प्रमाण कमी आहे. मध्यम उंची असल्यामुळे जमिनीवर लोळत नाही. करपा किंवा कडा करपा या रोगाला प्रतिकारक असून, वेळेवर पेरणी व लावणी केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

विद्यापीठ प्रक्षेत्रात जागेची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांच्या मदतीने बियाण्याची लागवड केली जाते. बीजोत्पादन वाढीसाठी महामंडळाने तयारी दर्शविली तर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाणाची उपलब्धता करून देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT