Kolhapur News: ‘‘यंदाच्या हंगामात तुटणाऱ्या उसाला पहिली उचल विनाकपात ३७५१ रुपये मिळावी या मागणीचा दहा नोव्हेंबरपर्यंत विचार करावा, अन्यथा यंदा हंगाम सुरू करू देणार नाही, ’’ नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.संघटनेच्या वतीने जयसिंगपूर (ता.शिरोळ) येथे गुरुवारी (ता.१६) आयोजित ऊस परिषदेत ते बोलत होते. हसन मुरसल अध्यक्षस्थानी होते. गेल्या हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन एफआरपी अधिक २०० रुपये प्रमाणे मिळाल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही असा इशारा यावेळी दिली.Sugarcane Rate: ‘माळेगाव’चा अंतिम दर ३४५० रुपये .श्री. शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीच्या विरोधात कारखानदारांनी घेतलेली भूमिका, काटामारी, रिकव्हरी चोरीबाबत कारखानदारावर टीकेची जोड उठवली. यंदा उसाचे उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांनी ऊस तोडायला गडबड करू नये. एकरकमी एफआरपीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. न्यायालयात ही आम्ही लढाई जिंकली आहे. आता ते सर्वोच्च न्यायलयात गेले आहेत, ती ही आम्ही जिंकू, असेही ते म्हणाले..श्री. शेट्टी म्हणाले, की राज्य सरकारने खासगी व सहकारी साखर कारखान्यांना २५ किलोमीटर परिघाचे कार्यक्षेत्र निश्चित करून त्यांना सरंक्षण दिले आहे. मग २५ किलोमीटर परिघातील ऊस असणाऱ्या शेतकऱ्यांची तोडणी वाहतूक प्रतिटन ७५० रुपये होत असताना ९०० ते ११०० रुपये तोडणी वाहतूक शेतकऱ्यांकडून वसूल करून प्रतिटन ३५० रुपयांची लूट होत आहे. ऊस माफियांचा नवा वर्ग तयार झाला आहे. .Raju Shetti: काटा मारणारेच भाजपमध्ये; कारवाईचे धाडस दाखवा: राजू शेट्टी.ते म्हणाले, की आज साखरेचा भाव ४००० ते ४१०० रुपये क्विंटलला आहे. उसाचा भाव ३००० रुपये असेल, तर हा ११०० चा जो फरक आहे, हीच खरी लूट आहे. आणि ह्या लुटीचे रहस्य काय असेल तर साखर कारखानदार आणि सरकार दोघांनी मिळून संगनमताने लुटलेले आहे आणि ही लूट आपल्याला परत आणायची आहे. या वेळी राजेंद्र गड्यानवर, प्रकाश पोफळे, सूर्यभान जाधव, अजित पवार आदींसह राज्यभरातून आलेल्या स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली..महत्त्वाचे ठरावमहापूर व अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेली मदत दिशाभूल करणारी असून २०१९ च्या शासन निर्णयाच्या धर्तीवर नुकसान भरपाई देण्यात यावी.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सात-बारा कोरा करावा.राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता १५ रुपये कपातीचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा. राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ॲानलाइन करण्यात यावेत..एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काटामारी व रिकव्हरी चोरी यावरही तातडीने नियंत्रण आणावे. केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरून ४५ रुपये करावी व इथेनॅाल खरेदी दरामध्ये प्रतिलिटर ५ रुपयांनी वाढ करावी.सर्वोच्च न्यायालयात एक रकमी एफआरपीच्या विरोधात आव्हान याचिका दाखल केलेली आहे ती मागे घ्यावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.