Pune APMC: पुणे बाजार समितीचे चौकशी समिती अधिकारी बदलले
Agricultural Market Committee: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) गैरव्यवहारांच्या ५१ मुद्द्यांवरील चौकशीला नवे वळण मिळाले आहे. चौकशी अधिकारी प्रकाश जगताप यांना हटवून विभागीय सहनिबंधक योगिराज सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली असून, तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.