Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : नगरच्या पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांत विक्रमी कांदा क्षेत्र

Onion Production : कृषी विभागाकडे असलेल्या अहवालानुसार रब्बीची अंतिम पेरणी जाहीर झाली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यातील बहुतांश भागात पाण्याची टंचाई आहे. मात्र तरीही ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथील शेतकऱ्यांनी यंदाही कांदा लागवडीला प्राधान्य दिले आहे. पारनेर, श्रीगोंदा, नगर, कर्जत, नेवासा तालुक्यांत विक्रमी लागवड झाली आहे. कृषी विभागाकडे असलेल्या अहवालानुसार रब्बीची अंतिम पेरणी जाहीर झाली आहे. आतापर्यंत १ लाख ७३ हजार ४९३ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या दहा वर्षांत कांदा उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. उसाचा पट्टा असलेल्या भागातील शेतकऱ्यांचाही कांदा उत्पादनाकडे कल आहे. जिल्ह्यात आतापर्यंत खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून अडीच लाख हेक्टरपर्यंत लागवड झाली होती. यंदा पुरेसा पाऊस नसल्याने खरिपातील पिके (Crop) वाया गेली.

रब्बीतही अनेक गावांत टंचाईचा मोठा फटका बसला. कोरडवाहू भागात ज्वारी, हरभरा घेण्याला प्राधान्य दिले गेले. कांदा लागवडीच्या भागात यंदा त्याची लागवड कमी होण्याचा अंदाज होता, मात्र मध्यंतरी जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले. ही बाब कांदा लागवडीला फायदेशीर ठरली आहे. त्यामुळे कांदा (Onion) क्षेत्र वाढले आहे.

यंदा खरिपात २१ हजार हेक्टर, लेट खरिपात ५६ हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. रब्बी, उन्हाळी मिळून सव्वा लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत रब्बी, उन्हाळी मिळून ९५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

विशेष म्हणजे यंदा कांदा दरात (Onion Price) सातत्याने पडझड होत आहे. निर्यातबंदीचा प्रश्‍न कायम आहे. यामुळे पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. सहा महिन्यांपासून कांदा दर २५ रुपयांच्या आत आहे. तरीही कांदा लागवडीला प्राधान्य दिले जात आहे.

तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टर)

नगर ः १६,४५७, पारनेर ः २९,०३५, श्रीगोंदा ः २६,१९१, कर्जत ः १३०८८, जामखेड ः ४,८५२, शेवगाव ः ८,५७४, पाथर्डी ः ९,४४९, नेवासा ः २०,०३४, राहुरी ः ३,११७, संगमनेर ः ५,९४२, अकोले ः १०,३१३, कोपरगाव ः ९,४०५, श्रीरामपूर ः ८,६७९, राहाता ः ३,१५७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT