Chhatrapati Sambhajinagar : सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत यंदा २०२३-२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अर्ली खरीप, लेट खरीप, रब्बी मिळून ३६ हजार ६२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जवळपास ३१ हजार ५६८ हेक्टरवर कांदा लागवड झाली होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर हा सर्वाधिक कांदा उत्पादकांचा तालुका आहे. त्यापाठोपाठ गंगापूर, कन्नड, पैठण, छत्रपती संभाजीनगर हे तालुके कांदा उत्पादक म्हणून ओळखले जातात. एकीकडे कांदा दरावरून तसेच निर्यात बंदीवरून रणकंदन सुरू आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांदा हे आर्थिक आधार देणारे पीक आहे.
जिल्ह्यात अर्ली खरिपाचे ५५१८ हेक्टर, लेट खरिपाचे ४५०० हेक्टर तर रब्बीचे १९ हजार ९३० असे मिळून जवळपास २९ हजार ९४९ हेक्टर कांदा क्षेत्र आहे. त्या तुलनेत फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत ३६ हजार ६२ हेक्टरवर कांदा लागवड झाली. त्यात ५७१३ हेक्टरवरील अर्ली खरीप, ३१८७ लेट खरीप तर २६ हजार ७१५ हेक्टरवर रब्बी कांदा क्षेत्र आहे.
अर्ली खरीप कांद्यापासून जवळपास ८७ हजार ९५५ टन कांदा उत्पादन झाले तर लेट खरिपाच्या कांद्यापासून ५९ हजार ४७० टन व रब्बीच्या कांद्यापासून ६ लाख ३३ हजार ४४७ टन असे मिळून यंदा जवळपास ७ लाख ८० हजार ८७२ टन कांदा उत्पादन अपेक्षित आहे. शिवाय यंदा तीनही हंगामातील उत्पादित कांद्याचे हेक्टरी उत्पादन सरासरी २१.६५ टन प्रती हेक्टर अपेक्षित आहे.
२०२२-२३ च्या हंगामात जिल्ह्यात ५६५३ हेक्टरवरील अर्ली खरीप, ३५९७ हेक्टरवर लेट खरीप तर २२ हजार ३१८ हेक्टर रब्बी कांदा क्षेत्र होते. त्यातून ६ लाख ४५ हजार १९१ कांदा उत्पादन झाले तर उत्पादकता हेक्टरी २०.४४ टन मिळाली.
तालुकानिहाय कांदा लागवड (हेक्टरमध्ये)
छत्रपती संभाजीनगर ९७४
पैठण २०८१
फुलंब्री १३०
वैजापूर २३०००
गंगापूर ५५००
खुलताबाद २६४
सिल्लोड ४८
सोयगाव ११८
कन्नड ३९४७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.