Turmeric Market Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Market : वायद्यांमध्ये हळददराचा विक्रम ; कमी उत्पादनामुळे तेजी टिकून राहण्याचा अंदाज

Team Agrowon

Turmeric Production : देशातील बाजारात हळदीच्या भावात चांगली वाढ झाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेली लागवड, कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीच्या भावाला आधार मिळत आहे. तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच हळदीचे भाव (Turmeric Price) पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे देशातील हळद लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. हळद लागवड यंदा जवळपास ३० टक्क्यांनी घटली आहे. त्यातच पीक वाढीच्या काळात महत्त्वाच्या उत्पादक भागांमध्ये पाऊस कमी होता.

तर जास्त तापमान आणि बदलत्या वातावरणाचाही फटका हळद पिकाला बसला. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक भागांत हळद काढणी सुरू झाली. त्यामुळे हळद लागवडीत नेमकी किती घट येत आहे हे पुढे येत आहे. त्याचाही परिणाम आपल्याला हळदीच्या बाजारावर दिसून येत आहे.

देशात आता मराठवाडा (Marathwada) विभागात हळद क्षेत्र चांगलेच विस्तारले आहे. त्यामुळे देशाच्या हळद बाजाराचे लक्ष मराठवाड्यातील हळद पिकाकडे असते. यंदा मराठवड्यातील हळद काढणीला उशीर होत आहे. याचा परिणाम हळदीच्या उत्पादनावर दिसून येत आहे. या भागातील हळद आता कुठे बाजारात दाखल होत आहे. त्यातही हळद उत्पादनात घट दिसून आली.

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील बाजारांमधील हळदीची आवकही सरासरीपेक्षा कमीच दिसून येत आहे. धरमपुरी, कर्नाटक आणि इरोड भागातील बाजारांतील आवक अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी असली तरी हळदीला उठाव चांगला आहे. त्यामुळे हळदीच्या भावात सुधारणा दिसून आली.

निर्यात-आयात कमी
जगात भारत हळद निर्यातीत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मात्र देशातील भाव जास्त असल्याने हळदीच्या निर्यातीत घट झाली आहे. तर आयातही २५ टक्क्यांनी कमी राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.

बाजार समित्यांमधील भावपातळी
देशातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या भावात चांगली तेजी आली आहे. मागील चार आठवड्यांमध्येच भावात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. सध्या बाजारात हळदीला सरासरी १३ हजार ते १७ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक कमीच आहे.

वायद्यांमध्ये विक्रम
देशातील एनसीडीईएक्स म्हणजेच वायदे बाजारात हळदीच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी टप्पा गाठला. हळदीने मंगळवारी (ता. १२) १९ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला होता. एप्रिलमध्ये वायद्यांमधील भाव ६ हजार ४७० रुपये होता. भाव उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर पुन्हा काहीसे नरमले. पण भावाने मंगळवारी आतापर्यंतचा विक्रमी टप्पा गाठला होता.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT