Women Self-Help Group Agrowon
ॲग्रो विशेष

Self-Help Group : सोलापूर जिल्ह्यातील आठ हजार ६९५ बचत गटांना ४१८ कोटींचे कर्ज

Women Empowerment : जिल्ह्यातील बचत गटांना सातत्याने कर्जवाटप अधिक करण्याचा पायंडा पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात उमेद, बॅंक व बचत गटांच्या एकत्रित कामगिरीने हा आकडा वाढता राहिला आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील बचतगटांना कर्ज देण्याचे बँकांचे वर्षभराचे एकूण उद्दिष्ट ३२० कोटी असताना मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा फायदा होऊन हा आकडा ४१८ कोटींवर पोचला आहे. वर्षभरात एकट्या माळशिरस तालुक्यातील बचतगटांना ८० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील बचत गटांना सातत्याने कर्जवाटप अधिक करण्याचा पायंडा पडला आहे. सोलापूर जिल्ह्यात उमेद, बॅंक व बचत गटांच्या एकत्रित कामगिरीने हा आकडा वाढता राहिला आहे. यावर्षी देखील मार्च अखेरीस कर्ज वाटपाचा आकडा वाढला आहे. या आधी या आर्थिक वर्षात ३२० कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरले होते.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा १०० दिवसाचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामध्ये देखील कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढवून घ्यावे असे ठरले. त्यामुळे उर्वरित कर्ज प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. बॅंकांनी घेतलेला पुढाकार पाहता बचतगटांना जोरदार संधी मिळाली आहे. तसेच बचत गटांनी पुढाकार घेऊन काही व्यवसाय व शेतकरी उत्पादक कंपन्या देखील स्थापन केल्या आहेत.

तालुकानिहाय बचत गटांना आतापर्यंत झालेले बचत गटांची संख्या व कर्ज वाटप

तालुका बचतगटांची संख्या कर्जाची रक्कम

उत्तर सोलापूर ८३७ ३४ कोटी ७६ लाख

मंगळवेढा ५९५ ३४ कोटी २१ लाख

माढा १११६ ५३ कोटी ९० लाख

माळशिरस १५२३ ८० कोटी १५ लाख

बार्शी ८०० ३८ कोटी ८१ लाख

सांगोला ७८८ ४२ कोटी ६२ लाख

पंढरपूर ९३८ ४१ कोटी ३४ लाख

मोहोळ ७२७ ३५ कोटी चार लाख

द.सोलापूर ५८४ २५ कोटी ९७ लाख

करमाळा ३५३ १६ कोटी ८० लाख

अक्कलकोट ४३४ १५ कोटी १८ लाख

एकूण सोलापूर जिल्हा ८६९५ ४१८ कोटी ९५ लाख

जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम व प्रकल्प संचालक डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक उद्दिष्टांच्या तुलनेत जादा कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे कर्जवाटपाचा आकडा चारशे कोटींवर गेला आहे.
- सचिन चवरे, जिल्हा समन्वयक, उमेद, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT