Market Bulletin: कापूस आवक कमीच देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाची आवक कमी झालेली आहे. तर कापसाला चांगला उठाव आहे. यामुळे कापसाच्या भावाला चांगला आधार आहे. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाला उठाव असल्याने सीसीआयनेही कापूस खरेदीच्या भावात खंडीमागे ९०० रुपयांची वाढ केली आहे. सीसीआयने आतापर्यंत ५ हजार ४०० रुपये भाव वाढवला आहे. कपसाचा भाव काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीनला उठावदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला उठाव चांगला आहे. खाद्यतेलाचे भाव टिकून आहेत. तसेच शेजारच्या देशांकडून सोयापेंडला चांगला उठाव आहे. यामुळे सोयाबीन ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. सोयाबीनची मागणी पुढील काळातही टिकून राहूण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनचे भावही टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक.तूर दबावातदेशातील बाजाराता तुरीच्या भावात मागील काही दिवसांपासून काहिसे चढ उतार दिसून आली आहेत. स्थानिक बाजारातील आवकही सरासरीच्या तुलनेत कमी दिसत आहे. तरीही तुरीला उठावही चांगला आहे. असे असले तरीही तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमीच आहे. तुरीला सध्या बाजारात सरासरी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीची आयातही सुरु आहे. तुरीचा भाव काही दिवस स्थिर राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार.सरकी टिकूनदेशातील बाजारात मागील काही महिनाभरापासून सरकी भाव तेजीत आहेत. सध्या सरकी तेल आणि सरकी पेंडेला चांगली मागणी आहे. खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सरकी तेलाचेही भाव वाढले आहेत. तर तेलबिया पेंडेच्या दरवाढीचा फायदा सरकी दरालाही मिळत आहे. सध्या सरकी बाजारात ४ हजार ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. सध्या बाजारातील कापसाची आवकही कमी होत आहे. त्यामुळे सरकीची आवकही पुढील काळात कमीच राहील, असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..हळद टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून हळदीचा भाव स्थिरावला आहे. दुसरीकडे हळदीची काढणी वेगाने सुरु असून बाजारातील आवकही सुधारणात आहे. हळदीला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. यंदा हळदीचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा काहीसे वाढल्याचा अंदाज आहे. मात्र पावसाचा हळद पिकाला फटका बसला आहे. आवकेचा दबाव पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.