Women Self-Help Groups : परभणी जिल्ह्यात साडेतीन हजार बचत गट

Women Empowerment through SHGs : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून परभणी जिल्ह्यात साडेतीन हजार महिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून ३७ हजार ५०० महिलांचे संघटन झाले आहे.
Women Self-Help Group
Women EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) माध्यमातून परभणी जिल्ह्यात साडेतीन हजार महिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून ३७ हजार ५०० महिलांचे संघटन झाले आहे.

बचत गटांच्या १३ हजारांवर महिलांनी शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. तीन महिला शेतकरी कंपन्या स्थापन झाल्या आहेत. त्याद्वारे निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढला आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या असून जीवमानाचा दर्जा सुधारला आहे, अशी माहिती ‘माविम’चे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली.

Women Self-Help Group
Self-Help Group Funds : राज्यात बचत गटांसाठी सात कोटींचा निधी वितरित

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांचे कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, आरोग्यविषयक सक्षमीकरणाचे कार्य केले जाते. जिल्ह्यात ८ लोकसंचलित साधन केंद्राद्वारे महिलांसाठी विविध योजनांची अमंलबजावणी केली जाते. त्यात परभणी शहर, परभणी ग्रामीण, जिंतूर, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा, ताडकळस येथील केंद्रांचा समावेश आहे.

Women Self-Help Group
Self Help Group Loan : पुणे जिल्ह्यातील बचत गटांच्या अंगणी अवतरली समृद्धी

जिल्ह्यात सिंगणापूर (ता.परभणी) वृंदाली महिला शेतकरी उत्पादक कंपनी, पूर्णा येथे सृष्टी महिला शेतकरी उत्पादक कंपनी, परभणी येथे आकांक्षा महिला शेतकरी उत्पादक कंपनी या तीन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. प्रत्येक कंपनीत परिसरातील १० ते १५ गावांतील ३५० महिला शेतकरी सभासद आहेत. धान्य स्वच्छता व प्रतवारी, सोयाबीन, डाळ प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. स्त्री पुरुष समानता अंतर्गत जमीन, घर दोघांचे उपक्रम राबविला जात आहे. सकस आहारासाठी दीड हजारावर सेंद्रिय परसबागा तयार करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील महिला स्वयंसाह्यता गटांना आजवर २६० कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात चालू आर्थिक वर्षातील ५० कोटी रुपये कर्जाचा समावेश आहे. यंदा १ हजार ५० गटांना प्रत्येकी सरासरी ५ लाख रुपये कर्ज देण्यात आले.

जिल्ह्यातील बचत गट अंतर्गत ६५ टक्के महिलांनी गृहउद्योग सुरू केले आहेत. सुमारे तेरा हजारांवर महिलांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गंत वझूर, बामणी, दैठणा, डिघोळ येथे डाळ प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.

बचत गटांमुळे महिलांचा बँक व्यवहाराचे ज्ञान झाले आहे. आत्मविश्‍वास वाढला असून, राहणीमाचा दर्जा उंचावला आहे.
- बाळासाहेब झिंजाडे, जिल्हा समन्वय अधिकारी, ‘माविम’, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com