Maize Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Cultivation: मराठवाड्यात मक्याची विक्रमी ३ लाख ४८ हजार हेक्टरवर लागवड

Marathwada Farming: यंदा मराठवाड्यात मका पिकाच्या लागवडीत विक्रमी वाढ झाली असून ३.४८ लाख हेक्टरवर लागवड झाल्याची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक २.७ लाख हेक्टरवर लागवड झाली असून ही अलीकडच्या पाच वर्षांतील सर्वाधिक आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News: खरीप हंगामात लागवड होणाऱ्या मका पिकाची मराठवाड्यात विक्रमी लागवड झाली आहे. सर्वसाधारण २ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा सुमारे ३ लाख ४८ हजार हेक्टरवर मका क्षेत्र पोहोचले असून, त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा आहे.

मराठवाड्यात जालना व छत्रपती संभाजीनगर हे दोन जिल्हे मक्याचे हब म्हणून ओळखले जातात. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील इतरही काही जिल्ह्यांत तीनही हंगामात मका पीक घेतले जाते. यंदा मराठवाड्यात मका पिकाच्या सर्वसाधारण २ लाख ५६ हजार ६५०.१० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ३ लाख ४८ हजार ३६५.२८ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या १३५.७३ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.

यामध्ये विक्रमी सर्वाधिक २ लाख ७० हजार ९६०.६० हेक्टर क्षेत्रावर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लागवड झाली आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांतील ही सर्वाधिक लागवड आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांत मक्याचे क्षेत्र दोन, सव्वादोन लाखांच्या पुढे कधी गेले नव्हते हे विशेष.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापाठोपाठ अनुक्रमे जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली यांचा मका लागवड करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये समावेश होतो. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री या तालुक्यांमध्ये मक्याचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे.

दरात स्थिरता, उत्पादनही टिकून

सोयाबीन, कपाशी व मका ही मराठवाड्यातील प्रमुख पिके मानली जातात. यापैकी सोयाबीन व कपाशी या दोन पिकांमध्ये गत काही वर्षांपासून उत्पादन खर्चाला परवडणारे दर न मिळणे व उत्पादनात वाढ किंवा सातत्य न राहणे हे दोन प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. कपाशीत वेचणीचे दर व मजुरांचा प्रश्न मोठा आहे.

या दोन्ही पिकांच्या तुलनेत गत दोन-तीन वर्षांपासून मका पिकाचे दर मात्र स्थिर व टिकून असल्याची स्थिती आहे. मक्याची उत्पादकताही टिकून असून सरासरी सुमारे ३२ ते ४० क्विंटलपर्यंत हेक्टरी मका उत्पादन होते. त्यातही एकरी सुमारे २० ते २५ क्विंटल तर काही ४० ते ५० क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरीही मराठवाड्यात आहेत. दर टिकून राहण्यामागे पोल्ट्री खाद्य, मुरघास, स्टार्च आणि इथेनॉल यासाठी मक्याचा वापर वाढल्याचे कारणही सांगितले जाते.

कपाशी, सोयाबीनला अपेक्षित बाजारभाव नाही, उत्पादनात घट आहे. दुसरीकडे दरात स्थिरता व उत्पादनात सातत्य यामुळे शेतकरी सोयाबीनऐवजी मक्याकडे वळले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर अलीकडच्या चार-पाच वर्षांतील यंदा विक्रमी लागवड झाली आहे.
प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
संतुलित अन्नद्रव्य व खत तसेच लष्करी अळी नियंत्रण केल्यास मकाचे अधिकचे उत्पादन घेणे शक्य आहे.
डॉ. सूर्यकांत पवार, सहयोगी संचालक संशोधन, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT