Silk Cocoon Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Cocoon Market: बीडमध्ये विक्रमी दीड लाख किलो रेशीम कोषांची आवक

Silk Price: बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ जुलै ते ४ ऑगस्ट या १३ दिवसांत विक्रमी १ लाख ५१ हजार ८३९ किलो रेशीम कोषांची आवक झाली. शिवाय सोमवारी (ता. ४) कमाल ६५० रुपये प्रतिकिलो उच्चांकी दर मिळाला.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Beed News: बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत २१ जुलै ते ४ ऑगस्ट या १३ दिवसांत विक्रमी १ लाख ५१ हजार ८३९ किलो रेशीम कोषांची आवक झाली. शिवाय सोमवारी (ता. ४) कमाल ६५० रुपये प्रतिकिलो उच्चांकी दर मिळाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात वस्त्रोद्योग संचालनालयाच्या मान्यतेने स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ सुरू आहे. या बाजारपेठेत रेशीम कोष खरेदीसाठी रामनगर (कर्नाटक) पं. बंगाल, बेगलूर, भंडारा सांगली, लातूर, जालना, हींदपूर, चीकबालापूर, सीलगटा, तमिळनाडू, कानपूर, बेलगाम, हुबळी, गुलबर्गा, हैदराबाद, विजयवाडा येथील व्यापाऱ्यांसह स्थानिक व्यापारी येतात.

२०२१-२२ मध्ये ११८७ तर २०२२-२३ मध्ये ४८५० तसेच २०२३-२४ मध्ये ७३४० व डिसेंबर २०२४ पर्यंत ११,२८३ शेतकरी आपले रेशीम कोष विक्रीसाठी घेऊन आले होते. २१ जुलै ते ४ ऑगस्ट या १३ दिवसांत सुमारे १२३४ शेतकऱ्यांनी एक लाख ५१ हजार ८३९ किलो ८०० ग्राम रेशीम कोष विक्रीला आणल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.

या २१ व २८ जुलै या कालावधीत प्रत्येकी २४ हजार किलोच्या पुढे कोषांची आवक झाली, जी विक्रमी होती. सोमवारी (ता. ४) बाजारपेठेत ११३ शेतकऱ्यांनी १०,९१२ किलो ८०० ग्रॅम कोष विक्रीसाठी आणले. उच्चांकी ६५० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

बाजार समितीत रेशीम कोष बाजारपेठेत कोशांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. अलीकडची आवक विक्रमी आहे. शेड वाढविले असून इतर सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बाळासाहेब जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बीड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Session 2025 : लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पटहून अधिक झालं; कृषिमंत्री चौहान यांचं लोकसभेत उत्तर

Paddy Farming: सुधारित भात वाणांच्या निवडीवर भर

Ornamental Fish: शोभिवंत मत्स्य प्रजनन संवर्धन केंद्राची उभारणी

National Cooperative Policy: नव्या राष्ट्रीय सहकार धोरणाचा अन्वयार्थ

Agriculture University: कृषी विद्यापीठांचा फजितवाडा

SCROLL FOR NEXT