
Wardha News: हिंगणघाट बाजार समितीने आता तिळाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी यार्डवर तीळ खरेदीच्या प्रारंभ प्रसंगी ३४ क्विंटल तिळाची खरेदी झाली तर ९७११ रुपये क्विंटलचा दर मुहूर्ताला मिळाला आहे.
या वेळी बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच तीळ विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देत हिंगणघाट बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ॲड. कोठारी म्हणाले, की वातावरणातील बदलाच्या पार्श्वभूमीवर एकाच पिकावर असलेल्या अवलंबितामुळे जोखीम वाढती आहे.
त्याची दखल घेत शेतकऱ्यांनी मिश्र पिकांवर भर दिला पाहिजे. या प्रसंगी संचालक प्रफुल्ल बाडे, ओमप्रकाश डालीया, भागचंद ओस्तवाल, संजय कातरे, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस तडस, गोपाल मोहता, डी. एम. ओस्तवाल, रंचोड करवा, आर. बी. गुप्ता, भोजराज कामडी, सुभाष डालीया, संजय दुल्लानी यांची या वेळी उपस्थिती होती.
झाडगाव (ता. आर्वी) येथील शेतकरी पांडुरंग अवचट यांच्याकडील तिळाची मंगेश ढेकरे यांच्या तर रसुलाबाद (ता. आर्वी) येथील प्रफुल्ल सावरकर यांनी चार क्विंटल तीळ शाम उरकुडकर यांच्या अडतमध्ये विक्रीसाठी आणला होता. तिळाच्या खुल्या लिलावात भोजराज कामडी यांनी ९७११ तर अंशू करवा यांनी ९४११ रुपये क्विंटल असा उच्चांकी दर देत तीळ खरेदी केला. मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस तिळाची खरेदी बाजार समितीकडून केली जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.