Monsoon Session 2025 : लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पटहून अधिक झालं; कृषिमंत्री चौहान यांचं लोकसभेत उत्तर

Farmer Income Double : प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेतून किती निधी वितरीत करण्यात आला, असा प्रश्न भाजपचे खासदार माधवनेनी राव यांनी उपस्थित केला होता.
Monsoon Session 2025
Monsoon Session 2025 Agrowon
Published on
Updated on

Monsoon Session Live : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज आज (ता.५) दुपारी दोनपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली, तशी विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन केलं.

प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेतून किती निधी वितरीत करण्यात आला, असा प्रश्न भाजपचे खासदार माधवनेनी राव यांनी उपस्थित केला होता. त्यावर कृषिमंत्री चौहान यांनी उत्तर दिलं. परंतु विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती.

Monsoon Session 2025
Shivraj Singh Chouhan : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची कॉँग्रेसवर टिका

कृषिमंत्री म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील ११ वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. उत्पादन वाढवण, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादनाला योग्य दर देणे, नुकसान झालं तर भरपाई, नैसर्गिक शेतीसारखे अनेक उपाय केले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असून लाखो शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पटीहून अधिक झालं आहे." असे त्यांनी सांगितले.

कृषिमंत्री चौहान यांनी मागील ११ वर्षातील सरकारच्या अनुदानाचा तपशीलही दिला. "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतून ४ लाख कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. पंतप्रधान पिक विमा योजने २ लाख १२ हजार कोटी रुपये आणि खत अनुदानातून १४ लाख ६ हजार कोटी रुपये दिले आहेत. युरियाच्या एका पिशवीची किंमत १ हजार ६३३ रुपये २४ पैसे आहे. परंतु पंतप्रधान मोदींचे सरकार २६६ रुपये ही पिशवी शेतकऱ्यांना देतं. डीएपीची ५० किलोच्या पिशवीची किंमत ३ हजार १०० रुपये आहे. परंतु मोदी सरकार देत आहे १ हजार ३५० रुपयांमध्ये." असे कृषिमंत्री म्हणाले.

सरकारच्या खरेदीचे आकडेवारी देताना कृषिमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधकांमध्ये दम असेल तर ऐकून घ्या, म्हणत कॉंग्रेसला टोला लगावला. कृषिमंत्री म्हणाले, "कडधान्य, तेलबिया आणि खोबऱ्याची १ कोटी ७० लाख मेट्रिक टनाची खरेदी सरकारने केली आहे. गहू खरेदीसाठी ६ लाख ४ हजार कोटी रुपये, तांदूळ खरेदीवर १४ हजार ३८ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तर मागील ११ वर्षात ४३ लाख ८७ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत." असा दावा त्यांनी केला.

Monsoon Session 2025
Farmer Income Tax: शेती उत्पन्नावर आयकर लागू होणार?

कृषिमंत्री उत्तर देत असताना विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच होती. अध्यक्षानी सूचना देऊनही विरोधकांनी माघार घेतली नाही. त्यामुळे सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com