RBI Repo Rate Agrowon
ॲग्रो विशेष

RBI Repo Rate : रेपो रेट 'जैसे थे' ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेचे रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा घोषणा गव्हर्नर शशिकांत दास यांनी केली.

Team Agrowon

RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India) रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा घोषणा गव्हर्नर शशिकांत दास (Governor Shashikant Das) यांनी केली. पाहिल्या तिमाहीसाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट ६.५० टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी (ता.६) पतधोरण जाहीर केले.

"पतधोरण जाहीर करणाऱ्या सहापैकी पाच सदस्यांनी महागाईच्या मुद्द्यावर जोर दिला. या अस्थिरतेच्या काळात भारतातील बँकिंग आणि बिगर बँकिंग क्षेत्र मजबूत राहिले. तसेच देशातील बाजारपेठा विकसित झाल्या.

आर्थिक घडामोड लवचिक राहिल्या आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला २०२३ या आर्थिक वर्षात ७ विकासदर टक्के राहण्याची अपेक्षा आहे."असे शशिकांत दास म्हणाले.

देशातील महागाई आटोक्यात आली आहे त्यामुळे रेपो रेटमध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही दास म्हणाले.

देशातल्या वाढत्या महागाईला नियंत्रित करण्यासाठी सरकारने व्याजदर वाढीचा सपाटा लावला होता. रिझर्व्ह बॅंकेने सलग सहाव्यांदा फेब्रुवारी महिन्यात रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्याची झळ कर्जदारांना बसली होती.

चालू वर्षात ६.५ टक्क्यांवर विकासदर वाढीची अपेक्षा आहे. तसेच किरकोळ महागाई दर ५.२ टक्क्यांपर्यंत राहील, असेही दास म्हणाले.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने मागील ११ महिन्यात सहा वेळा रेपो रेट वाढवला आहे. त्यामुळे गृह कर्जाच्या हप्त्यामध्ये वाढ झाली होती. मे २०२२ पासून बेसिस पॉईटमध्ये २५० ची वाढ करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT