
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सलग चौथ्यांदा रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने पॉलिसी व्याजदरात (Policy Interest Rate) ५० आधार अंकांची वाढ केली आहे. यासह रेपो दर ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे, जो तीन वर्षांतील उच्चांक आहे. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय सेंट्रल बँकेच्या (Central Bank) चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. या वाढीमुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. मे महिन्यापासून रेपो दरात १.९० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर.
महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. आरबीआयने मे महिन्यात रेपो दरात १९० बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यूएस फेड रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदरात ७५ बेसिस पॉइंट्सने वाढ केली होती, त्यानंतर रुपयावर दबाव वाढला होता.
तसेच ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईत पुन्हा वाढ झाली होती. अशा परिस्थितीत आरबीआय शुक्रवारी (ता. ३०) रेपो दरात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असा विश्वास अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला होता.
कर्ज घेण्याचा खर्च वाढेल
रेपो दरात वाढ केल्यास कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होईल. कारण रेपो दरात वाढ झाल्याने बँकांच्या कर्ज खर्चात वाढ होईल. बँका ते ग्राहकांना देतील आणि त्यामुळे कर्ज घेणे महाग होणार आहे. याचा परिणाम घरांच्या विक्रीवरही होणार आहे. गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होऊन गृहकर्जाचा हप्ता वाढणार आहे.
इतर कर्ज देखील महागणार
गृहकर्जाव्यतिरिक्त वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जेही महाग होतील. रेपो दर वाढल्याने मुदत ठेव (एफडी) असलेल्या ग्राहकांना फायदा होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.