Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farming : ‘रावळगाव’तर्फे ऊस बेणे लागवडीविषयी गावोगावी मार्गदर्शन

Sugarcane Production : मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रावळगाव साखर कारखान्याच्या स्पायका ग्रीन एनर्जी अँड अॅग्रो प्रा. लि. व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रामध्ये लागण हंगाम २०२५-२६ करिता ऊस बेणे लागवड योजनेविषयी गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत असून यांस शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Nashik News : नाशिक : मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील रावळगाव साखर कारखान्याच्या स्पायका ग्रीन एनर्जी अँड अॅग्रो प्रा. लि. व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रामध्ये लागण हंगाम २०२५-२६ करिता ऊस बेणे लागवड योजनेविषयी गावोगावी मार्गदर्शन करण्यात येत असून यांस शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

कारखान्यातर्फे शुक्रवारी (ता. १४) कारखाना कार्यक्षेत्रातील खायदे गावात ऊस उत्पादकांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी मागदर्शन केले. गायकवाड म्हणाले, की कारखाना मालेगाव तालुक्यात ऊस गाळपात व ऊस दर वेळेत देण्यात अग्रेसर आहे. कारखाना कार्यक्षेत्रात गेल्या ७-८ वर्षांपासून ऊस विकासापासून वंचित होता.

कारखान्याची रिकव्हरी वाढविण्यासाठी चांगल्या प्रतिचा व चांगल्या रिकव्हरीचा ऊस उत्पादकांनी लावला पाहिजे. यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस उत्पादकांनी एकरी १०० ते १२० टन ऊस उत्पादनासाठी शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. उत्पादन वाढीसाठी माती परिक्षण करून घेणे त्यानुसार सेंद्रिय खतांचा वापर करावा. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कारखान्यावर अल्प दरात प्रेसमड विक्री सुरू केलेली आहे.

तसेच ऊस उत्पादन वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीचे व चांगल्या रिकव्हरीचे ऊस बेणे वाटप योजना राबविली जात आहे. यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून अल्पकालावधीसाठी ऊस बियाण्यांची मागणी केली जात आहे. रावळगाव कारखान्याच्या ५० किलोमीटरमध्ये ऊस लागवड करावी, असे अवाहन अध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी केले.

गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस नोंद सुरू करण्यात आलेली आहे. तरी सर्व ऊस उत्पादकांनी नोंद करून घेणे गरजेचे आहे. या वेळी सचिव शिवाजी कामठे, मार्गदर्शक अण्णासाहेब भामरे, उन्मय चव्हाण, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी देसाई, ऊस पुरवठा अधिकारी भिवराज सोनवणे, गट प्रमुख रोहीत पवार यांच्यासह ऊस उत्पादक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT