Dam Work Rajapur agrowon
ॲग्रो विशेष

Dam Work Rajapur : राजापुरातील नव्या धरणाचे काम रखडले, पाणीटंचाईची समस्या

New Dam Rajapur : पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जुन्या धरणाच्या खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे.

sandeep Shirguppe

Rajapur Dam Work : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील गेल्या कित्येक वर्षांपासून राजापूरवासीयांना भेडसावत असलेली एप्रिल-मेमधील पाणीटंचाईची समस्या यावर्षीही कायम आहे. भविष्यामध्ये पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी सायबाच्या धरणाच्या येथे नव्याने बांधण्यात येणारे धरण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या धरणाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, अद्यापही वीस टक्के काम निधीअभावी शिल्लक आहे. त्यामध्ये सतरा गेट वा गाळ्यांसह अन्य स्वरूपाच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी सुमारे सात कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

कोदवली येथील सायबाचे धरण गेल्या कित्येक वर्षापासून शहराचा मुख्य जलस्रोत आहे. या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा होत नसल्याने शहराला दरवर्षी एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जुन्या धरणाच्या (Dam) खालच्या बाजूला नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. या धरणाच्या कामासाठी १० कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम निधीअभावी रखडले आहे.

रखडलेल्या कामांमध्ये सतरा झडपे वा गाळ्यासह जोडरस्ता, वीजेची सुविधा यांसह अन्य स्वरूपाच्या कामांचा समावेश आहे. धरणाच्या उर्वरित कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी येथील पालिकेने शासनाकडे केली आहे.

दृष्टिक्षेपात जुने धरण

बांधकाम १८७८

बांधकामाचे स्वरूप दगडी बांधकाम

धरणाची लांबी- ३० मीटर

उंची- ४.५० मीटर

माथा रुंदी- ३.०० मीटर

पाण्याची पाईपलाईन ८ इंच

दृष्टिक्षेपात सायबाचे नवीन धरण

लांबी- ५० मीटर

उंची- ६.४८ मीटर

भिंत रुंदी- १० मीटर

झडपे वा गाळे- १७

माथा उंची ९७ मीटर

अंदाजपत्रक- सुमारे १० कोटी रुपये

संभाव्य पाणीसाठा- १०३ सहस्त्र घनमीटर

पाण्याची पाईपलाईन १४ इंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT