Amravati News: कापसावरील ११ टक्के आयात शुल्क केंद्र शासनाने १ जानेवारीपासून पूर्ववत लागू केल्यानंतर कापसाच्या दरात चढ-उतार सुरू झाले आहेत. महिनाभरात सुमारे ५०० रुपयांपर्यंत घसरण झाल्याने ‘पांढऱ्या सोन्या’चा भाव पुन्हा दबावात आला आहे. .जानेवारीअखेर कापसाला देशांतर्गत बाजारात ८ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र फेब्रुवारीत अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर आयात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आणि दरात घसरण झाली. सध्या बहुतांश बाजार समित्यांत कापसाचे व्यवहार ७,४०० ते ७,६०० रुपये प्रति क्विंटलदरम्यान होत आहेत..Cotton Market: खानदेशात कापूस आवकेत घट.हंगामात सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. गुलाबी बोंड अळी व बोंडसड यांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे. अनेक भागांत दोन ते तीन वेळा वेचणी करावी लागली. या कामी मजुरीवर मोठा खर्च झाला. दुसरीकडे उत्पादन कमी आणि दर घसरल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, अशी माहिती जाणकारांनी दिली.‘सीसीआय’ खरेदीला मुदतवाढीची मागणीजिल्ह्यातील १६ खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळाकडून (सीसीआय) ७,०९० रुपये हमीभावाने खरेदी सुरू आहे. ही खरेदी २७ फेब्रुवारीपर्यंत मर्यादित असून, त्यानंतर शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच कापसाची विक्री करावी लागणार आहे. यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याने शासकीय हमीभाव खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे..Cotton Picking Machine: वेचणी यंत्राचे स्वागत, पण....दरातील चढ-उतार, वाढलेला उत्पादन खर्च आणि घटलेले उत्पन्न या तिहेरी संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक दबावाखाली आहे. शासनाने बाजारात स्थिरता आणण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे..बाजारस्थितीसरकी (कॉटन सीड) : ४,००० ते ४,२०० रुपये प्रति क्विंटलरुई (कापूस लिंट) : ६२ सेंट प्रति पाऊंड (४५० ग्रॅम)रुई (खंडी – ३५६ किलो) : ५३,५०० ते ५४,००० रुपये.कापसाचे बाजारभाव (रु./क्विंटल)२७ जानेवारी : ७,९०० ते ८,१००३० जानेवारी : ७,८०० ते ८,०००६ फेब्रुवारी : ७,६०० ते ७,८००१३ फेब्रुवारी : ७,४०० ते ७,६५०१८ फेब्रुवारी : ७,३०० ते ७,५५०२० फेब्रुवारी : ७,४०० ते ७,६००.यंदा पावसामुळे कापसाची उत्पादकता घटली आहे. त्यातच ‘सीसीआय’कडून देखील या महिन्याच्या अखेरपर्यंतच कापसाची खरेदी होणार असल्याने कापूस दर आणखी दबावात येण्याची भीती आहे.गोविंद वैराळे, कापूस विषयाचे अभ्यासक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.