Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar Sugar: साखर कारखाना नीट चालवण्यापेक्षा नेतृत्वाचे लक्ष भलतीकडेच... शरद पवारांचा टोला

राज्यात खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. आजमितीला राज्यात जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत, जवळपास तेवढेच खासगी कारखाने आहेत.

Team Agrowon

‘‘यंदा उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात जास्त साखर उत्पादन झाले. देशात सगळ्यात जास्त साखर महाराष्ट्राने तयार केली. राज्यातील कष्ट करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचे श्रेय जाते,'' असे उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काढले.

सकाळ माध्यम समूहाने पुण्यात १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या सहकार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ‘सकाळ'चे अध्यक्ष प्रताप पवार, ‘सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुंबई बॅँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, भारतीय रिझर्व्ह बँकचे संचालक सतीश मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

साखर उत्पादनात महाराष्‍ट्राने आघाडी घेतलेली असली तरी राज्यातील काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

राज्यात खासगी कारखान्यांची संख्या वाढत आहे. आजमितीला राज्यात जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत, जवळपास तेवढेच खासगी कारखाने आहेत.

ही परिस्थिती फारशी चांगली नाही. परंतु ऊस व्यवस्थापन, तांत्रिक आणि प्रशासकीय प्रश्नांकडे अधिक लक्ष दिले तर सहकारी कारखान्यांना अडचणीतून बाहेर पडणं अवघड नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘‘सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यावर मात करण्यासाठी आर्थिक व्यवस्थापन, खर्चात कपात, ‘एफआरपी'साठी पुरेशी तरतूद, व्यावसायिक व्यवस्थापन, तांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे,'' असे पवार म्हणाले.


आपल्याकडे सहकारी साखर कारखान्यांमध्ये कामगार, कर्मचाऱ्यांची संख्या गरजेपेक्षा जास्त असते, या गोष्टीवर पवार यांनी बोट ठेवले.

ब्राझीलमध्ये दिवसाला ३५ ते ४० हजार टन ऊस गाळपाची क्षमता असणाऱ्या कारखान्यांमध्ये २० ते ३० कामगार असतात.

आपल्याकडे मात्र सहकारी साखर कारखान्यांचे नेतृत्व करणाऱ्यांचे लक्ष कारखाना नीट चालवण्यापेक्षा जास्तीत जास्त लोक कामावर ठेवण्यात असते.

त्याचा कारखान्यांच्या  अर्थकारणावर दुष्परिणाम होतो, असे पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT