Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : सोयाबीनचे दर वाढता वाढेनात

Soybean Rate : यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक वाढली असताना भाव दबावातच आहेत.

Team Agrowon

Amaravati News : यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक वाढली असताना भाव दबावातच आहेत. सरकारच्या दरवाढीच्या व आर्द्रतेत शिथिलतेच्या घोषणा बाजारात विरल्याचे चित्र आहे. येथील बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ४०५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

दिवाळीनंतर सोयाबीनच्या हंगामास साधारणतः प्रारंभ होतो. आर्थिक गरजेपायी शेतकरी सोयाबीन बाजारात आणतो. मात्र त्याच्या सोयाबीनला आर्द्रता व प्रतवारीच्या नावाखाली भाव मिळत नाही. हंगामापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या सप्ताहात सरासरी ४,२२५ रुपये दर मिळाला होता. आता नवीन सोयाबीन बाजारात येऊ लागला आहे.

सोमवारी (ता. २५) सरासरी ४,०७५ रुपये दर मिळाला. त्यानंतर शुक्रवारी (ता. २८) सोयाबीनला ४०५० ते ४२५० असा दर मिळाला. यंदाच्या हंगामात केंद्राने सोयाबीनला ४८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे. या दराने कुठेच खरेदी सुरू झालेली नाही. निवडणुकीच्या कालावधीत सरकारने शेतकऱ्यांचा रोष होऊ नये, यासाठी भावांतर योजना व सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचे आश्वासन दिले.

याबरोबरच आर्द्रतेचे प्रमाण १२ हून १५ टक्क्यांवर नेण्याचीही घोषणा केली. त्याचा थोडा परिणाम झाला, भाव तीनशे रुपयांनी वधारले. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी (ता. १९) दर पुन्हा कोसळून तीन हजार ९७५ रुपयांवर कोसळलेत. निवडणुकीनंतर भाव वधारतील, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा सोमवारी (ता. २५) मावळली.

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर उघडलेल्या बाजारात सोयाबीनचे दर कोसळलेलेच आहेत. तीन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमधील दरांपेक्षाही कमी दर सोमवारी मिळाले. राज्यात सत्ता आल्यास सोयाबीनला सहा हजार रुपये दर देऊ, असे आश्वासन पंतप्रधानांनी निवडणुकीत दिले होते. मात्र मध्य प्रदेशात सत्ता आल्यानंतरही हा दर मिळालेला नाही, तो महाराष्ट्रात मिळेल का? असा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

उत्पादन खर्चही निघेना

यंदाच्या हंगामात प्रतिकूल वातावरणाचा परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला आहे. उत्पादनाची सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात खरेदीदारांनी दर कमी ठेवले आहेत. मिळणाऱ्या भावात उत्पादनासाठी लागणारा खर्चही निघत नसल्याचे बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT