Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : सोलापूर बाजार समितीत नवीन कांद्याला दोन हजारांचा भाव

Onion Rate : सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर मंगळवारी (ता. ८) ३३४ गाड्या कांदा आवक नोंदविण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर बाजार समितीत सोमवारी ३२५ तर मंगळवारी (ता. ८) ३३४ गाड्या कांदा आवक नोंदविण्यात आली. यावेळी जुन्या कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तर नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत सोमवारी दोन हजार ते चार हजारांपर्यंत भाव होता. पावसाने भिजलेल्या कांद्याला प्रतिकिलो १० ते १५ रुपयांचा दर मिळाला.

सोलापूर बाजार समितीत सध्या नगर, नाशिक, धाराशिव, पुणे जिल्ह्यातून जुना कांदा येत आहे. सोमवारी आवक झालेल्या ३२५ गाड्यांमध्ये २०० गाड्या जुना कांदा होता तर १२५ गाड्या नवीन कांदा होता. मंगळवारी देखील आवक वाढली होती.

म्हसवड, फलटण, माळशिरस, कर्नाटक, बागलकोट, विजयपूर, कलबुर्गी येथून नवीन कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. आवक वाढल्याने १५ दिवसांपूर्वीचा दर सध्या राहिलेला नाही. साडेपाच हजार रुपये क्विंटलने जाणारा कांदा आता आवक वाढल्याने तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात यायला अजून एक महिन्याचा अवधी आहे. तत्पूर्वी, दर कमी झाल्याने बळिराजाची चिंता वाढू लागली आहे. त्यातच पुन्हा शेतकऱ्याला विकलेल्या कांद्याचे बिल रोखीने मिळत नाही. किमान १५ हजार रुपयांपेक्षा जास्त बिल झाल्यास त्यांना १५ दिवसांची तारीख टाकलेला धनादेश (चेक) दिला जात असल्याची वस्तुस्थिती आहे.

बंगळूर बाजारात १ हजार गाड्या आवक

सोलापूर बाजार समितीत मागील दोन दिवसांत ६५९ गाड्या कांदा आला होता, तर बंगळुरु बाजारात एक हजाराहून अधिक गाड्यांची आवक नोंदविली गेली. सध्या कर्नाटक परिसरातील नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणावर येत आहे.

नवीन कांद्याला सोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल कमाल दर साडेतीन ते चार हजार रुपये तर सरासरी दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत आवक वाढली तरीदेखील कांद्याचे दर तेजीत राहतील असा विश्वास बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT