Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : नेवासा फाटा येथे शेतकरी संघटनेचे ‘रास्ता रोको’

Sugarcane Farmer : नेवासे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. ९) नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

Team Agrowon

Nagar News : गळीत हंगाम सुरू करून अनेक दिवस झाले, तरी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही. कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाचे दर जाहीर करावेत,

तसेच केंद्र सरकारने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ नेवासे तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शनिवारी (ता. ९) नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले.

जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र अजूनही साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला नाही. साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत.

तसेच रसापासून इथेलॉन निर्मिती करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली, तसेच कांदा पीक निर्यात बंदी केली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्यासह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासे फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. इतर संघटना व पक्षांचे नेतेही यात सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT