Okra Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Okra Cultivation : जळगावात भेंडी लागवडीला वेग; क्षेत्र वाढणार

Okra Farming : दर्जेदार, निर्यातक्षम भेंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील भेंडी लागवडीस गती आली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : दर्जेदार, निर्यातक्षम भेंडी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील भेंडी लागवडीस गती आली आहे. यंदा लागवडीत काहीशी वाढ होईल, असे दिसत आहे.

जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल तालुक्यातील अनेक गावांमध्ये भेंडी लागवडीला वेग आला आहे. यंदा कमी कालावधी व मध्यम जमिनीत उत्पादन देणाऱ्या वाणांना शेतकरी पसंती देत आहेत.

धरणगाव, एरंडोलातील गिरणा नदीकाठचा भाग भेंडी लागवडीत अग्रेसर आहे. पावसाळी किंवा खरिपातील व उन्हाळ भेंडी या भागात असते. अलीकडे बारमाही भेंडी लागवड सुरू असते. अनेक शेतकरी आगाप लागवड करतात.

तर काही शेतकरी पावसाचे जोरदार आगमन झाल्यानंतर लागवड करतात. खरिपात कोरडवाहू भेंडीदेखील या भागात असते. मुंबईच्या बाजारात येथील भेंडीला बारमाही उठाव आहे. अनेक शेतकरी रब्बीत किंवा हिवाळ्यातील भेंडी लागवड करीत आहेत.

धरणगाव अग्रेसर

धरणगावमधील पथराड, बोरखेडा, चिंचखेडा, चोरगाव, चांदसर, लाडली, रेल, दोनगाव, पाळधी हा भाग प्रसिद्ध आहे. तर एरंडोलातील दापोरी, खर्ची, खेडी खुर्द, कढोली, जवखेडे आदी भागांतही भेंडीचे पीक असते. मोठे खरेदीदार थेट शेतातून खरेदी करतात. चांगली वित्तीय उलाढाल या भागात होत असते.

या भागात यंदा सुमारे ५० ते ६० एकरने भेंडीचे क्षेत्र वाढू शकते. एकूण १५० ते १५५ हेक्टरवर भेंडी लागवड अपेक्षित आहे. काही खरेदीदार थेट शेतकऱ्यांशी करार करून घेतात. भेंडीचे बियाणे, खते, कीडनाशके पुरवठा करतात. भेंडी काढणी सुरू झाल्यानंतर बियाणे, खत पुरवठ्यासंबंधीच्या निधीची कपात शेतकऱ्यांकडून करून घेतात. गेले १५ ते १७ वर्षे या भागात हा प्रघात आहे.

फेब्रुवारीत अनेकांची भेंडी काढणीला येईल. नंतर पुढील दोन ते अडीच महिने काढणी सुरू असते. मजुरांनाही रोज भेंडी काढणीचे काम या भागात उपलब्ध होते. चांगला पाऊस झाल्याने भेंडी लागवड वाढत आहे.

अनेक शेतकऱ्यांकडे कृत्रीम जलसाठे आहेत. दरही जागेवर १८ ते २० रुपये प्रतिकिलो मिळतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे शेतकरी लागवड करू लागले आहेत. सध्या पाट पद्धतीने किंवा ठिबकच्या साह्याने सिंचन करून भेंडी पीक वाढविले जात आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?

Farmers Issues: दोन लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित

PM POSHAN Shakti: कागदावर पौष्टिक मेनू; प्रत्यक्षात साधी खिचडी !

Agriculture Expo: के. के. वाघ कृषी महोत्सवात फलोत्पादनाचे ‘लाईव्ह प्लॉट्स’

Chia Cultivation: पूर्व विदर्भात ‘चिया’ लागवडीला चालना

SCROLL FOR NEXT