Okra Harvesting : जळगावात भेंडी पिकात काढणीला गती

Okra Crop : एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते.
Okra Crop
Okra CropAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र स्थिर होते. त्यात सध्या काढणीला गती आली असून, पीक बऱ्यापैकी आहे.

एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागात भेंडी पीक असते. तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागात भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते.

तसेच अनेक जण मार्चमध्ये लागवड करतात. परंतु मार्च व एप्रिलमधील लागवड घटली होती. भेंडीची लागवड सप्टेंबर व ऑक्टोबरमध्येही झाली आहे. ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून या महिन्यात काढणीला गती आली आहे. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक बरी आहे.

Okra Crop
Okra Farming : जळगावच्या भेंडीचा मुंबई, सुरतपर्यंत डंका

ज्या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत २० ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या भेंडीसही २० रुपये प्रतिकिलोचा दर आहे. या गावांत एरंडोल, धरणगाव भागातील मोठे खरेदीदार, एजंट भेंडीची खरेदी करीत आहेत.

या भेंडीची पाठवणूक मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, बडोदा येथे केली जात आहे. यामुळे स्थानिक बाजारात भेंडीला उठाव आहे. जळगाव इतर शहरांमधील आठवडी व इतर बाजारांत विक्रेते भेंडीची ५० ते ६० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री करीत आहेत.

Okra Crop
Okra Cultivation : जळगावात भेंडी लागवडीला अनेकांची पसंती

जळगाव येथील भाजीपाल्याचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव, सिल्लोडसह धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल आदी भागांतूनही भाजीपाल्याची आवक होते. सध्या भेंडीची आवक बऱ्यापैकी आहे. मागील महिन्यात भेंडीची जळगावच्या बाजारात प्रतिदिन सरासरी २१ क्विंटल आवक झाली होती.

या महिन्यात मागील आठ दिवसांत ही आवक प्रतिदिन सरासरी १८ ते १९ क्विंटल आहे. भेंडीला ऑक्टोबरमध्ये बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला होता. उन्हाळ्यात दर १५ पासून २५ रुपयांपर्यंत मिळाले होते. मार्चमध्ये अनेक शेतकऱ्यांनी भेंडीचे क्षेत्र रिकामे केले पण पुन्हा भेंडी लागवड केली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com