
Nagpur News : भेंडीची आवक सातत्याने कमी होत असल्याने बाजारात भेंडीदरात सुधारणा अनुभवली जात आहे. कळमना बाजारात भेंडी आवक पूर्वीच्या ७० ते ८० क्विंटलवरून आता थेट २० ते ३० क्विंटलपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे भेंडीला ४००० ते ५००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.
कळमना बाजारात स्थानिकस्तरावरून भेंडीची आवक होते. त्यासोबत लगतच्या भंडारा जिल्ह्यातूनही भेंडी आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. हंगामात आवक वाढते त्या वेळी नागपूर सीमेलगतच्या मध्य प्रदेशातील शेतकरीदेखील इतर भाजीपाला पिकांसोबत भेंडीदेखील विक्रीसाठी आणतात.
सात नोव्हेंबरच्या दरम्यान स्थानिक भेंडीची आवक ७० क्विंटलवर होती. त्या वेळी अवघ्या २००० ते २५०० रुपयांनी याचे व्यवहार होत होते. त्यानंतरच्या काळात सातत्याने आवक कमी होत गेली. त्याच वेळी मागणीत वाढ होत असल्याने हे दर सुधारले. १३ नोव्हेंबरला आवक ३० क्विंटल आणि दर ३००० ते ३५०० रुपयांवर पोहोचले होते.
त्यापुढील काळात १६ नोव्हेंबरला भेंडी ३५०० ते ४००० रुपये अशी होती. त्या वेळी आवकही ८० क्विंटल असल्याचे सांगण्यात आले. २६ नोव्हेंबरपासून मात्र भेंडीच्या दरांनी एकदम उसळी घेत हे दर ४५०० ते ५००० रुपयांवर पोहोचले. या वेळी आवक कमी होत अवघी दहा क्विंटलची होती. त्यानंतरच्या काळात दरातील ही तेजी कायम आहे. आता ४००० ते ५००० रुपये प्रति क्विंटल असा भेंडीचा दर आहे.
अमरावती बाजारात आवक कमी
विदर्भातील दुसरी मोठी बाजारपेठ असलेल्या अमरावती फळ व भाजीपाला बाजारातही भेंडी आवक कमी होत दहा क्विंटलवर आली आहे. या ठिकाणी भेंडीला ३५०० ते ४००० रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.